जीएसटीसंदर्भातील शिवसेनेच्या सर्व मागण्या सरकारकडून मान्य
By admin | Published: May 9, 2017 06:00 PM2017-05-09T18:00:56+5:302017-05-09T18:00:56+5:30
वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीबाबत शिवसेनेने केलेल्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. जीएसटीची
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीबाबत शिवसेनेने केलेल्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. जीएसटीची अमलबजावणी सुरू झाल्यावर महापालिकांच्या वाट्याचे उत्पन्न कमी होणार असल्याची शंका शिवसेनेला आहे. त्यामुळे जीएसटीबाबत शिवसेनेने ताठर भूमिका घेतली होती. त्यानंतर या मुद्द्यावर शिवसेनेची मनधरणी करण्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.
जीएसटी विधेयकाची प्रत द्या, मग पाठिंब्याबाबत विचार करू असे सांगत उद्धव ठाकरे यांनी जीएसटीला पाठिंबा देण्यास नकार दिला होता. दरम्यान, आज वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली. तसेच राज्य सरकारने शिवसेनेने जीएसटीबाबत केलेल्या तीन मागण्या मान्य केल्या आहेत.
ऑनलाइन लोकमत