‘मैत्रेय’च्या सर्व ठेवीदारांना पैसे मिळणार

By admin | Published: July 27, 2016 12:50 AM2016-07-27T00:50:31+5:302016-07-27T00:50:31+5:30

मैत्रेय’ गुंतवणूक घोटाळ््याप्रकरणी सर्व ठेवीदारांना व्याजासह रक्कम परत करण्यास जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम. एच. मोरे यांनी मंगळवारी मंजुरी दिली आहे.

All the depositors of 'Maitreya' will get the money | ‘मैत्रेय’च्या सर्व ठेवीदारांना पैसे मिळणार

‘मैत्रेय’च्या सर्व ठेवीदारांना पैसे मिळणार

Next

नाशिक : ‘मैत्रेय’ गुंतवणूक घोटाळ््याप्रकरणी सर्व ठेवीदारांना व्याजासह रक्कम परत करण्यास जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम. एच. मोरे यांनी मंगळवारी मंजुरी दिली आहे.
मैत्रेयचे संचालक वर्षा सत्पाळकर व जनार्दन परुळेकर यांचा अंतरिम जामिनही न्यायालयाने मंजूर केला. गुरुवारच्या सुनावणीत सरकारी पक्ष व मैत्रेयच्या वकिलांकडून युक्तिवाद पूर्ण करण्यात आला होता; मात्र न्यायालयाने निर्णय प्रलंबित ठेवला होता. फसवणुकीची एकूण रक्कम ३१ कोटी २७ लाख रुपयांपर्यंत पोहोचली असून, तक्रारदारांची संख्या जवळपास १४ हजार एवढी आहे. एस्क्रो खात्यामध्ये सध्या सहा कोटी ४२ लाख रुपये जमा असून, कंपनीच्या सर्व मालमत्तांची माहिती पोलिसांकडे असून एस्क्रो खात्यात वेगाने पैसे जमा होणार आहेत. सर्व मुदत पूर्ण झालेल्या ठेवीदारांना त्यांची रक्कम मिळणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी दिली.
तक्रार दिलेले ठेवीदार तसेच गुंतवणूक केलेल्या रकमेचे पुरावे देणाऱ्या ठेवीदारांचे पैसे देण्याची तपास अधिकाऱ्यांना तजवीज करावी, असे न्यायालयाने सांगितले
आहे. (प्रतिनिधी)

ऐतिहासिक निर्णय : अशा घोटाळ््यामध्ये संशयितांना केवळ शिक्षा होते; ठेवीदारांना ठेवी परत मिळण्याचा आदेश प्रथमच न्यायालयाकडून आल्याने हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे जगन्नाथन यांनी सांगितले.

Web Title: All the depositors of 'Maitreya' will get the money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.