पुनीतच्या शोधासाठी देशभर अकरा पथके तैनात

By admin | Published: April 26, 2016 03:25 PM2016-04-26T15:25:26+5:302016-04-26T15:28:19+5:30

येथील चिंचोली एमआयडीसीतील एव्हॉन लाइफ सायन्सेस लिमिटेड कंपनीत ठाणो पोलिसांनी 25 एप्रिलर्पयत 23 टन (4 हजार कोटी रूपयांचा) साठा जप्त केला आह़े याप्रकरणातील मुख्य सुत्रधार

All the eleven teams deployed for the search of Puneet | पुनीतच्या शोधासाठी देशभर अकरा पथके तैनात

पुनीतच्या शोधासाठी देशभर अकरा पथके तैनात

Next
>- आप्पासाहेब पाटील/अमित सोमवंशी
 
सोलापूर : येथील चिंचोली एमआयडीसीतील एव्हॉन लाइफ सायन्सेस लिमिटेड कंपनीत ठाणो पोलिसांनी 25 एप्रिलर्पयत 23 टन (4 हजार कोटी रूपयांचा) साठा जप्त केला आह़े याप्रकरणातील मुख्य सुत्रधार पुनीत श्रृंगीच्या शोधासाठी ठाणो पोलीसांनी देशभरात 11 विशेष पथके तैनात केली असून कंपनीच्या संचालकांच्या चौकशीसाठी ठाणो पोलीस हैद्राबाद शहरात दाखल झाले आहेत़  तसेच सोमवारी या प्रकरणी कंपनीतील 40 अधिकारी व कर्मचा:यांची कसून चौकशी करून सापडलेल्या सर्व साठय़ांचा पंचनामा ठाणो पोलीसांनी केला आह़े याशिवाय हैद्राबाद येथे संचालकांच्या चौकशीसाठी एक पथक तैनात करण्यता आल्याचे तपासी पोलीस अधिका:यांनी सांगितल़े
दरम्यान, सोलापूर येथील चिंचोली एमआयडीसीत 32 एकर जागेवर एव्हॉन या नावाची औषधनिर्माण करणारी कंपनी आह़े या कंपनीत इफेड्रीन ड्रग्ज तयार होत असल्याची माहिती ठाणे पोलीसांना मिळताच ठाणे पोलीसांनी 16 एप्रिल रोजी एव्हॉन कंपनीत अचानकपणो धाड टाकून 18 टन ड्रग्ज जप्त केले होत़े यावेळी दोघांना ठाणे पोलीसांनी अटक केली़ दरम्यान गुजरात पोलीसांनी जप्त केलेल्या सव्वा टन इफेड्रीन याच कंपनीतील असल्याचे समोर आल़े त्यानंतर 2.5 टन पुन्हा जप्त केला़ आणखीन साठा असल्याची दाट शक्यता पोलीसांना येऊ लागल्याने पोलीसांनी तपासाची सुत्रे वेगाने हलविली़ त्यामुळे तपासाच्या कामात गती आली आह़े शिवाय पुनीत श्रृंगी यांनी किती परदेश दौरे केले, कोणा कोणाशी संपर्क आहे याची गोपनिय माहिती ठाणो पोलीस घेत आहेत़
 
याठिकाणी आहेत पथके तैनात
इफेड्रीन साठा प्रकरणातील मुख्य सुत्रधार पुनीत श्रृंगी व अन्य साथीदारांच्या शोधासाठी ठाणो पोलीसांचे 11 पथके तैनात करण्यात आली आहेत़ याशिवाय अन्य राज्यातील पोलीस प्रमुखांचा समावेश असलेली पथके त्या त्या राज्यात तैनात करण्यात आली आहेत़ हैद्राबाद याठिकाणी संचालकाचा शोध पोलीस घेत आहेत़ शिवाय देशभरातील मुख्य विमानतळावर पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत़. ठाणे पोलीसांनी गुजरातमध्ये दोन पथके, मुंबईत चार पथके, दिल्लीत एक पथक यासह हैद्राबाद, पुणो, सोलापूरमध्ये पथके रवाना केली आहेत़ तपासकामी सहाय्यक आयुक्त भरत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणो क्राईम ब्रॅचचे पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त पी़व्ही़पाटील, एम़बी़घाडगे, दिलीप शिंदे, महादेव चाबुकस्वार, टी़एम़टोपले, डी़डी़सोनवणो, अनिल पवार, डी़क़ेकिणी, पी़पी़भोगले, आऱएम़सौदागर, पी़एन,निंबाळकर, अन्न व औषध प्रशासनाच्या सहा़आयुक्त माधुरी पवार व इतर सहकारी कार्यरत आहेत़
 
कंपनीच्या विविध विभागाची तपासणी़...
औद्योगिक वसाहतील एव्हॉन कंपनीच्या विविध विभागाची तपासणी ठाणो पोलीस करीत आहेत़ सोमवारी ठाणो पोलीसांनी मागील वर्षभरात गेटपास, कोण आल़े़़कोण गेल़े़़यासह आलेल्या वाहनांची नंबरचीही तपासणी करून सर्वच विभागांना सील ठोकण्याचे काम सोमवारी उशीरार्पयत सुरूच होत़े तसेच कंपनीच्या काही संगणकांच्या हार्डडिस्कही पोलीसांनी ताब्यात घेतल्या आहेत़. 
 
भुयारी मार्गाचा शोध सुरू़...
एव्हॉन कंपनीवर सध्या पोलीसांचा मोठा फौजफाटा आह़े या कंपनीत बेकायदेशीररित्या आढळून आलेल्या इफेड्रीन साठय़ाप्रकरणाचा कसून शोधासाठी ठाणो पोलीस रात्रंदिवस कार्यरत आहेत़ ठाणो पोलीसांनी कंपनीतील रजिस्टर, कार्यप्रणाली, अंतर्गत प्रणाली, भुयारी मार्गाचा शोध घेत नकाशामार्फत घेत आह़े याकामी चार पोलीस अधिकारी कार्यरत आहेत़
 
ठाणोसह सोलापूर पोलीस हदरल़े़...
सोलापूर येथील औद्योगिक वसाहतीत एव्हॉन कंपनीच्या परिसरात प्रारंभी 18 टन अमली पदार्थाचा साठा सापडला होता़ त्यानंतर सातत्याने प्रत्येक तपास फे:यात अनेक नव्या नव्या बाबी व माहिती समोर येत असल्याने ठाणोसह सोलापूर पोलीसही हदरले आह़े विशेषत: पोलीसांना आणखी किती साठे आहेत़़़यात आणखीन किती जण सामील असतील याचा शोध सुरूच आह़े
 
दुबईत व दक्षिण आफ्रिकेत बैठक...
- इफेड्रीनच्या पावडर विक्रीसंदर्भात दुबई व दक्षिण आफ्रिका या देशात दोन वेळेस बैठका झाल्याचे पोलीस तपासात पुढे आले आह़े सदर बैठकीत कोणकोण होत़े़़ माल किती विकण्यासाठी आणला होता़़़ किती रक्कम मिळणार होती़़़ याबाबतचा संपूर्ण तपास पोलीस यंत्रणा घेत आह़े
राजकीय हस्तक्षेप नाहीच..
- सोलापूर शहरात इफेड्रीन या अमली पदार्थाचा साठा मोठय़ा प्रमाणात सापडला़ ज्या कंपनीत हा माल सापडला ती कंपनी कोण्या राजकीय व्यक्तीची आहे का, त्यामुळे राजकीय दबाव येऊन तपासकामात अडथळा येईल का, असाही संशय व्यक्त करण्यात येत होता़ मात्र सद्यस्थितीत कोणत्याही राजकीय पक्षाचा दबाव ठाणो पोलिसांवर नसल्याचे पोलीस अधिका:यांनीच सांगितल़े त्यामुळे राजकीय हस्तक्षेप नाहीच, हे उघड होत आह़े
कंपनीत कुठेही कॅमेरे नाहीत..
- औद्योगिक वसाहतीत 32 एकरावर विस्तारलेल्या एव्हॉन कंपनीत एकही सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आला नाही़ त्यामुळे या कंपनीत कोण येत होते, कोण जात होते, याबाबतची कसलीही माहिती मिळत नाही़ त्यामुळे पोलीस तपासकामात मोठय़ा प्रमाणात अडथळे निर्माण होत आहेत़ कंपनीत बेकायदेशीर धंदे होत असल्यानेच सीसीटीव्ही कॅमेरे लावले नाहीत का, असाही प्रश्न आता उपस्थित होत आह़े
महावितरण व तहसीलदारांना पत्र
- औद्योगिक वसाहतीत असलेल्या एव्हॉन कंपनीच्या मागील एक वर्षाच्या कालावधीत ज्या ज्या घटना, घडामोडी घडल्या़ शिवाय लाईट बिल, पाणीपट्टी, एमआयडीसीची जागा कोणाच्या नावावर आहे, यांसह तपासकामी महत्त्वपूर्ण असलेली माहिती मिळविण्यासाठी महावितरण व तहसीलदारांना पत्र देण्यात आले असल्याचे ठाणो पथकाने सांगितल़े
साठा का नष्ट केला नाही..
- सोलापूरमधील एव्हॉन लाईफ सायन्सेस लिमिटेड या कंपनीकडे औषधाचा साठा मोठय़ा प्रमाणात तयार होता़ नियमानुसार तो 2002 ते 2005 या कालावधीत या कंपनीने नष्ट करणो गरजेचे होते; मात्र तसे न करता त्यावर योग्य ती प्रक्रिया करून ते औषध नशेसाठी विकण्यास स्वामी व त्याच्या सहकार्याने सुरू केल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आह़े
अहवाल पुण्याला..
- अन्न व औषध प्रशासनाने कंपनीची तपासणी केली असता त्यांच्याकडे विविध त्रुटी आढळून आल्या़ शिवाय किती साठा आहे, रेकॉर्ड मेन्टेन नाही, कंपनीच्या आवारात बेकायदेशीररित्या साठा ठेवल्याचे आढळून आल्याने अन्न व औषध प्रशासनाने त्याबाबतचा संपूर्ण अहवाल पुढील कार्यवाहीसाठी पुणो सहायक आयुक्त यांच्याकडे पाठविला आह़े.

Web Title: All the eleven teams deployed for the search of Puneet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.