दिशा सालियन प्रकरणाचे सर्व पुरावे तयार, चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट; तारीखही सांगितली...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 01:39 PM2022-02-22T13:39:26+5:302022-02-22T13:39:57+5:30

दिशा सालियन प्रकरणी केंद्रीय नारायण राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर हल्लाबोल केलेला असताना आता त्यात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुढचं पाऊल टाकत या प्रकरणाचा लवकरच उलगडा होणार असल्याचं वक्तव्य केलं आहे.

all evidence of Disha Salian case is ready says Chandrakant Patil | दिशा सालियन प्रकरणाचे सर्व पुरावे तयार, चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट; तारीखही सांगितली...

दिशा सालियन प्रकरणाचे सर्व पुरावे तयार, चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट; तारीखही सांगितली...

googlenewsNext

दिशा सालियन प्रकरणी केंद्रीय नारायण राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर हल्लाबोल केलेला असताना आता त्यात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुढचं पाऊल टाकत या प्रकरणाचा लवकरच उलगडा होणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. दिशा सालियन प्रकरणाचा सविस्तर उलगडा होणार असून त्या संबंधित सर्व पुरावे तयार आहेत, असा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तसंच दिशा सालियन प्रकरणाची सर्व माहिती ७ मार्च रोजी सर्वांसमोर येईल असाही दावा पाटील यांनी केला आहे. 

अभिनेता सुशांत सिंग राजपूत हा दिशा सालियनच्या हत्येचा उलगडा करणार होता म्हणून त्याची हत्या केल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. दिशा सालियन हिनं आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली होती असाही दावा राणेंनी केला आहे. आता चंद्रकांत पाटील यांनी याप्रकरणाबाबत ७ मार्च रोजी सर्व पुरावे बाहेर येणार असल्याचं म्हणत मोठा गौप्यस्फोट केला आहे. 

"७ मार्चनंतर दिशा सालियन प्रकरणाचा उलगडा होणार असून त्या संबंधिचे सर्व पुरावे तयार आहेत. दरम्यान दिशा सालियन प्रकरणाचा उलगडा होऊ नये यासाठी शिवराळ भाषा वापरणं सुरू आहे", असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवरही निशाणा साधला आहे. 

आम्हालाही जगू द्या, नाहीतर...
राजकारण्यांनी आमचं जगणं आता मुश्कील केलं आहे. आम्हाला जगू द्या. आमच्या मुलीची अशीच बदनामी होत राहिली तर आम्हीही आमच्या जीवाचं काहीतरी बरंवाईट करुन घेऊ आणि त्याला हेच राजकारणी जबाबदार असतील असा इशारा दिशा सालियनच्या मातोश्रींनी दिला आहे. यावेळी राजकारण्यांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांमुळे आम्हीही तणावात आहोत, असं दिशाच्या मातोश्री म्हणाल्या. दिशाच्या मृत्यूचं प्रकरण आता जास्त वाढवू नका असं हात जोडून सर्वांना विनंती करणाऱ्या दिशाच्या मातोश्रींना अश्रू अनावर झाले होते. 

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज दिशा सालियनच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर दिशा सालियनच्या मातोश्री आणि वडिलांनी एक लेखी तक्रारपत्र किशोरी पेडणेकर यांच्याकडे दिलं. दिशाची बदनामी होत असल्याची तक्रार सालियन यांच्या मातोश्रींनी महिला आयोगाकडे केली आहे.

 

Web Title: all evidence of Disha Salian case is ready says Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.