‘पोलिओच्या उच्चाटनासाठी शासनाच्या सर्व यंत्रणांनी एकत्रित काम करावे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2017 02:01 AM2017-01-20T02:01:03+5:302017-01-20T02:01:03+5:30

पोलिओचे समूळ उच्चाटन व्हावे यासाठी शासनाच्या सर्व यंत्रणांनी एकत्रित काम करून राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियान यशस्वी करावे

'All government machinery should work together for annihilation of polio' | ‘पोलिओच्या उच्चाटनासाठी शासनाच्या सर्व यंत्रणांनी एकत्रित काम करावे’

‘पोलिओच्या उच्चाटनासाठी शासनाच्या सर्व यंत्रणांनी एकत्रित काम करावे’

Next


मुंबई : राज्यातून पोलिओचे समूळ उच्चाटन व्हावे यासाठी शासनाच्या सर्व यंत्रणांनी एकत्रित काम करून राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियान यशस्वी करावे, अशी सूचना अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. विजय सतबीर सिंह यांनी केली.
राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियान राज्यात २९ जानेवारी व २ एप्रिल रोजी राबविण्यात येणार आहे. यासंदर्भातील आढावा बैठक आरोग्य विभागात आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी सिंह बोलत होते. या बैठकीस अभियानाचे संचालक डॉ. प्रदीप व्यास, आरोग्य सेवा विभागाचे डॉ. सतीश पवार, अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांच्यासह मध्य रेल्वे, कोकण रेल्वे, जागतिक आरोग्य संघटना, मुंबई महापालिका, इंडियन मेडिकल असोसिएशन, वैद्यकीय शिक्षण, युनिसेफचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत अभियानासंदर्भातील योजना, सूचना, समस्या याबाबत चर्चा करण्यात आली. सिंह म्हणाले की, राज्य शासनाने ही मोहीम आजतागायत यशस्वीरीत्या राबवली आहे. पोलिओ तीन प्रकारच्या विषाणूंमुळे होतो. त्यापैकी टाइप २ या विषाणूमुळे होणारा पोलिओ नष्ट करण्यात राज्य शासन यशस्वी ठरले आहे. टाइप १ व ३ संदर्भात ५ वर्षांखालील मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कायम ठेवण्यासाठी ‘बायवॅलन्ट ओरल पोलिओ वॅक्सिन’ देण्यात येते. हे वॅक्सिन राज्यातील प्रत्येक बालकास मिळावे यासाठी संबंधित सर्व विभागांनी प्रयत्न करीत हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन सिंह यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केले.
अभियान राबविण्यासंदर्भात जिल्हा, तालुका स्तरावर केल्या जाणाऱ्या उपाययोजना व अडचणींची माहितीही सिंह यांनी यावेळी घेतली. (प्रतिनिधी)

Web Title: 'All government machinery should work together for annihilation of polio'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.