राज्यात लवकरच सर्वंकष कृषी विमा योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2015 02:03 AM2015-05-11T02:03:13+5:302015-05-11T02:03:13+5:30
मंगरुळपीर तालुक्यातील शेतकरी मेळाव्यात कृषी मंत्र्यांची घोषणा.
मंगरुळपीर (जि.वाशिम) : राज्यातील शेतक-यांच्या वाईट परिस्थितीत अवकाळी आणि गारपीटीने भर घातली आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी विम्याचे नियम बदलून राज्यात आता सवर्ंकक्ष पिक विमा योजना शासन आणणार आहे. त्याद्वारे शेतक-याला शंभर टक्के भरपाई मिळेल, अशी घोषणा राज्याचे महसूल, कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी येथील शेतकरी मेळाव्यात केली. ना.खडसे म्हणाले, बिकट परिस्थितीतून शेतक-यांना बाहेर काढण्यासाठी शासन अतिशय गंभीर पावले उचलत आहे. आजपयर्ंत पिक विमा योजना फक्त हवामानाधारित होती. यापुढे सर्व बाबींची नुकसान भरपाई मिळावी यासाठी सवर्ंकक्ष कृषी विमा योजना राज्यात सुरु करणार आहे. एवढ्यावर शासन थांबणार नसून शेती प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी यापुढे विविध नाविन्यपूर्ण योजना, प्रकल्प राबविणार आहे. रासायनिक खताच्या बेसुमार वापरामुळे शेतीचा पोत खालवला आहे. त्यासाठी शासन सेंद्रीय शेती धोरण लवकरच जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी राज्याचे गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार हरिष पिंपळे, आमदार तानाजी मुरकुटे, माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, माजी आमदार विजयराव जाधव आदि मान्यवर उपस्थित होते.