राज्यातील सर्व ग्रंथालये, मेट्रो सेवा उद्यापासून सुरू होणार; राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय

By Ravalnath.patil | Published: October 14, 2020 04:33 PM2020-10-14T16:33:00+5:302020-10-14T16:34:05+5:30

Unlock: शाळा, महाविद्यालये सुरू करण्यास अद्याप परवानगी देण्यात आली नाही. पण, शाळेतील शिक्षक वर्गाला ५० टक्के उपस्थितीची मुभा देण्यात आली आहे. 

All libraries in the state, Metro service will start from tomorrow; An important decision of the state government | राज्यातील सर्व ग्रंथालये, मेट्रो सेवा उद्यापासून सुरू होणार; राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय

राज्यातील सर्व ग्रंथालये, मेट्रो सेवा उद्यापासून सुरू होणार; राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय

googlenewsNext
ठळक मुद्देकंटेन्मेंट झोन बाहेरील आठवडी बाजार सुद्धा सुरू करण्यास परवानगी  दिली आहे.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले लॉकडाऊन हळूहळू उठवण्यात येत आहे. राज्यात मिशन बिगेन अगेन अंतर्गत राज्य सरकारने  नवीन परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये उद्यापासून राज्यातील सर्व ग्रंथालये आणि टप्प्याटप्प्याने मुंबईतील मेट्रो सेवा सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. तसेच, कंटेन्मेंट झोन बाहेरील आठवडी बाजार सुद्धा सुरू करण्यास परवानगी  दिली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात ग्रंथालये सुरू करण्याची मागणी होत होती. त्यानुसार राज्य सरकारने राज्यातील सर्व ग्रंथालये १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात परवानगी दिली आहे. त्यामुळे विद्यार्थी, पुस्तकप्रेमींसाठी ही दिलासादायक बाब आहे. मात्र, शाळा, महाविद्यालये सुरू करण्यास अद्याप परवानगी देण्यात आली नाही. पण, शाळेतील शिक्षक वर्गाला ५० टक्के उपस्थितीची मुभा देण्यात आली आहे. 

याचबरोबर, टप्प्याटप्प्याने मुंबईतील मेट्रो सेवा सुरु करण्यास राज्य सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून प्रवासादरम्यान मुंबईकरांना होणारा त्रास थोडासा कमी होणार आहे. मेट्रो सेवा सुरु करण्याबाबतची SOP लवकरच नगरविकास विभागाकडून जारी करण्यात येणार आहे. याशिवाय, कन्टेनमेंट झोनबाहेरील आठवडी बाजार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. यामध्ये कन्टेनमेंट झोनबाहेरील दुकाने सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.

राज ठाकरेंची भेट!
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील ग्रंथालये सुरू करण्याची मागणी होत होती. या मागणीसाठी ग्रंथालयांच्या प्रतिनिधींनी गेल्या आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीत राज्यातील ग्रंथालयांच्या प्रतिनिधींनी ग्रंथालय पुन्हा सुरू करा, अशी मागणी करत राज ठाकरे यांना निवेदनही दिले होते.
 

Read in English

Web Title: All libraries in the state, Metro service will start from tomorrow; An important decision of the state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.