‘ईव्हीएम’विरोधात सर्वपक्षीयांची निदर्शने
By admin | Published: March 3, 2017 05:54 AM2017-03-03T05:54:49+5:302017-03-03T05:54:49+5:30
‘ईव्हीएम’ मशीनमध्ये भारतीय जनता पार्टीने फेरफार केल्याचा आरोप करत सर्वपक्षीय नेत्यांनी गुरुवारी आझाद मैदानात निदर्शने केली
मुंबई- महानगरपालिका निवडणुकीत वापरण्यात आलेल्या ‘ईव्हीएम’ मशीनमध्ये भारतीय जनता पार्टीने फेरफार केल्याचा आरोप करत सर्वपक्षीय नेत्यांनी गुरुवारी आझाद मैदानात निदर्शने केली; शिवाय हजारोंच्या संख्येने मतदारांना परतावे लागलेल्या प्रभागात फेरनिवडणुका घेण्याची मागणीही या वेळी करण्यात आली. प्रसंगी आझाद मैदानात गोलमेज परिषद भरवण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला आहे.मतदानावेळी निवडणूक आयोगाच्या अॅप आणि महापालिकेच्या मतदार यादीत तफावत आढळून आल्याचा आरोप शिवसेनेचे कृष्णा पोवळे यांनी केला. पोवळे म्हणाले की, मतदानादिवशी हजारो मतदारांना मतदानाविनाच परतावे लागले. याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, अरेरावीची उत्तरे देण्यात
आली.त्यासाठी मतदारांकडून संमतीपत्रक भरून घेत आहे. आतापर्यंत जमा झालेल्या संमतीपत्रकांची संख्या पाहता नक्कीच मतदान यंत्रात फेरफार झाल्याची खात्री वाटत असल्याचा आरोप पोवळे यांनी केला आहे. दक्षिण मुंबईतील सर्व प्रभागांत फेरनिवडणुकीची मागणी या वेळी प्रामुख्याने करण्यात आली. त्यासाठी प्रथम या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी उपस्थितांनी केली.