‘स्मार्ट’ सिटी संदर्भात सर्वपक्षीय बैठक

By admin | Published: December 17, 2015 02:48 AM2015-12-17T02:48:57+5:302015-12-17T02:48:57+5:30

केंद्र सरकारने देशातील १०० शहरांचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. स्मार्ट सिटी संदर्भात लोकप्रतिनिधींनी केलेल्या वेगवेगळ्या सूचनांचा स्वीकार करण्यात येईल.

All-party meeting in the 'smart' city | ‘स्मार्ट’ सिटी संदर्भात सर्वपक्षीय बैठक

‘स्मार्ट’ सिटी संदर्भात सर्वपक्षीय बैठक

Next

नागपूर : केंद्र सरकारने देशातील १०० शहरांचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. स्मार्ट सिटी संदर्भात लोकप्रतिनिधींनी केलेल्या वेगवेगळ्या सूचनांचा स्वीकार करण्यात येईल. तसेच या संदर्भात सर्वपक्षीय गटनेत्यांची लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या उत्तरात दिली.

स्मार्ट सिटी संदर्भात केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. महापालिकेबाहेरील लोकप्रतिनिधींनाही विश्वासात घ्यायला हवे. स्पेशल परपज व्हेईकल (एसपीव्ही) ची स्थापना केली जाणार आहे. एसपीव्हीला कर्ज उभारावयाचे झाल्यास यासाठी महापालिकेची मान्यता घ्यावी लागेल.
पुणे महापालिकेचा स्मार्ट सिटीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला आहे. राज्य सरकारकडून घोषित करण्यात आलेल्या राज्यातील दहा शहरात पुणे शहराचा समावेश राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
स्मार्ट सिटी योजना ही वरच्या वर्गाला लाभ मिळण्यासाठी नसून शहरातील नागरिकांना उत्तम दर्जाच्या मूलभूत सुविधा पुरविण्याचा या योजनेचा हेतू आहे. कचऱ्याची विल्हेवाट, सांडपाणी प्रक्रिया व पुनर्वापर, सुरक्षित सिटी, झोपडपट्टीधारकांना चांगल्या सोयी उपलब्ध करणे. गुंतवणुकीत वाढ, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याचा प्रयत्न अपेक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुणे स्मार्ट सिटी प्रस्तावाला मंजुरी देताना महापालिकेने काही अटी घालून दिल्याबाबतचा प्रश्न अनंत गाडगीळ यांनी उपस्थित केला. यावर मुख्यमंत्र्यांनी महापालिकेलाच धोरण निश्चित करावयाचे असल्याचे स्पष्ट केले. शरद रणपिसे व अनिल सोले यांनी एसपीव्हीच्या अध्यक्षपदी महापौर असावा अशी सूचना केली. एसपीव्ही जेएनएनयूआरएम योजनेतही होते. यातूनच २४ बाय ७ योजना राबविण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. प्रश्नावरील चर्चेदरम्यान संजय दत्त, नीलम गोऱ्हे आदींची प्रश्न उपस्थित केले. (प्रतिनिधी)

Web Title: All-party meeting in the 'smart' city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.