सरसकट निर्बंध शिथिल केलेले नाहीत, जिल्हा प्रशासनाने परिस्थिती पाहून निर्बंधांबाबत निर्णय घ्यावा - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 07:48 AM2021-06-07T07:48:41+5:302021-06-07T07:55:00+5:30

Uddhav Thackeray : कुठेही सरसकट निर्बंध शिथिल केलेले नाहीत तसेच कोणत्याही लेव्हलमध्ये कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक कार्यक्रम, समारोहासाठी गर्दी होणार नाही, याची काटेकोर काळजी घ्या, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिले.

All restrictions have not been relaxed, the district administration should take a decision on the restrictions based on the situation - Chief Minister | सरसकट निर्बंध शिथिल केलेले नाहीत, जिल्हा प्रशासनाने परिस्थिती पाहून निर्बंधांबाबत निर्णय घ्यावा - मुख्यमंत्री

सरसकट निर्बंध शिथिल केलेले नाहीत, जिल्हा प्रशासनाने परिस्थिती पाहून निर्बंधांबाबत निर्णय घ्यावा - मुख्यमंत्री

Next
ठळक मुद्दे‘ब्रेक दि चेन’मध्ये निर्बंधांबाबत निकष, पातळ्या निश्चित करणाऱ्या ४ जूनच्या आदेशानंतर निर्बंध शिथील झाल्याचा समज निर्माण झाला होता.निर्बंध लावायचे किंवा नाही, याकरिता पातळ्या ठरविण्यात आल्या आहेत.

मुंबई : कोरोनाचे आव्हान संपलेले नाही. ‘ब्रेक दि चेन’मध्ये आपण जे निकष आणि पाच पातळ्या (लेव्हल) ठरविल्या आहेत त्यावर स्थानिक प्रशासनाने विचार करून निर्बंधांबाबत निर्णय घ्यायचा आहे. कुठेही सरसकट निर्बंध शिथिल केलेले नाहीत तसेच कोणत्याही लेव्हलमध्ये कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक कार्यक्रम, समारोहासाठी गर्दी होणार नाही, याची काटेकोर काळजी घ्या, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिले.

‘ब्रेक दि चेन’मध्ये निर्बंधांबाबत निकष, पातळ्या निश्चित करणाऱ्या ४ जूनच्या आदेशानंतर निर्बंध शिथील झाल्याचा समज निर्माण झाला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त व पोलीस अधिकारी यांची एकत्रित बैठक घेऊन कुठेही सरसकट निर्बंध शिथील केले नसून, आपापल्या भागातील परिस्थितीनुसार प्रसंगी निर्बंध कडक करण्याचा निर्णयही घ्यावा, असे स्पष्ट केले. ते म्हणाले की, रुग्णसंख्या कमी करण्यात यश येत असले तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. निर्बंध लावायचे किंवा नाही, याकरिता पातळ्या ठरविण्यात आल्या आहेत.

कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार होत असतात. लेव्हल्स ठरविल्या असल्या तरी संसर्ग किती वाढेल, याविषयी मनात शंका असतील तर व्यवहारांवर निर्बंध घाला, दबावाला बळी पडू नका, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, निर्णयाचा अधिकार सर्व स्थानिक जिल्हा प्रशासनानाला आहे. संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन अधिक काळजी घ्या, सावध रहा, रात्रच नव्हे तर दिवसदेखील वैऱ्याचा आहे.
कोरोनाचा संसर्ग राज्यभर सारखा नाही. त्यामुळे एकीकडे विषाणूची साखळी तोडणे आणि दुसरीकडे आर्थिक, सामाजिक दैनंदिन व्यवहार शिस्तबद्धरित्या सुरू कसे होतील, हे पाहणे एवढ्याचसाठी निर्बंधांच्या या पातळ्या ठरविल्या आहेत. आपण स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणून या निकषांच्या आधारे निर्बंधांबाबत योग्य तो निर्णय घ्यायचा आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

गर्दी, नियम तोडलेले चालणार नाही!
- नव्या आदेशात वर्गीकरण केले असले तरी कोणत्याही परिस्थितीत कोविडला आमंत्रण देणारी गर्दी, समारंभ, सोहळे चालणार नाहीत.  
- आरोग्यविषयक नियमांचे काटेकोर पालन झाले पाहिजे. दैनंदिन व्यवहार किती उघडायचे, किती काळ सुरु ठेवायचे, त्याच्या वेळा, या सर्व बाबी त्या-त्या भागातील प्रशासनाने ठरवायच्या असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

कोरोनामुक्त गावांची टक्केवारी गृहीत धरणार
ग्रामीण भागातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आपण कोरोनामुक्त गाव करा, म्हणून आवाहन केले आहे. या कोरोनामुक्त गावांची टक्केवारीदेखील आपल्याला या नव्या पातळ्यांमध्ये गृहीत धरावी लागेल.

Web Title: All restrictions have not been relaxed, the district administration should take a decision on the restrictions based on the situation - Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.