सरकारी रुग्णालयांतील सर्व सेवा आता नि:शुल्क; आरोग्य विभाग मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव ठेवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 03:51 PM2023-08-02T15:51:46+5:302023-08-02T15:52:21+5:30

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यासाठी आग्रही असून याविषयीचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार आहे. 

All services in government hospitals now free; The Health Department will put a proposal before the Cabinet | सरकारी रुग्णालयांतील सर्व सेवा आता नि:शुल्क; आरोग्य विभाग मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव ठेवणार

सरकारी रुग्णालयांतील सर्व सेवा आता नि:शुल्क; आरोग्य विभाग मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव ठेवणार

googlenewsNext

मुंबई : राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांतील सेवा नि:शुल्क करण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाने तयार केला आहे. यामुळे आता ओपीडी शुल्कासह अगदी विविध चाचण्याही मोफत करता येणार आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यासाठी आग्रही असून याविषयीचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार आहे. 

राज्यात २३ जिल्हा रुग्णालये,  १० हजार ७८० उपकेंद्रे, तर १९०६ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. नाममात्र शुल्क आकारून या रुग्णालयांत रुग्णांवर उपचार तसेच चाचण्या केल्या जातात. यासाठी  बाह्यरुग्ण नोंदणी १० रुपये, आंतररुग्ण शुल्क २० रुपये, आहार शुल्क १० रुपये, हिमोग्लोबिन चाचणी २० रुपये, लघवी चाचणी ३५ रुपये, आदी शुल्क आकारण्यात येते. यासाठीचे शुल्क २०१५ मध्ये निर्धारित करण्यात आले आहे. 

सरकारी रुग्णालयातील या सर्व तपासण्या, चाचण्या नि:शुल्क करण्याची घोषणा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केली होती. त्याची अंमलबजावणी लवकरच होणार आहे.

७० कोटींचा महसूल बुडणार
सरकारी रुग्णालयांत जे नाममात्र शुल्क आकारले जाते, त्यातून साधारणत: ७० कोटी रुपयांचा महसूल आरोग्य विभागाला मिळतो. तो महसूल आता बुडणार आहे. तो बुडाल्याने आरोग्यसेवांवर विशेष परिणाम होणार नसल्याचे आरोग्यमंत्र्यांचे मत आहे.
 

Web Title: All services in government hospitals now free; The Health Department will put a proposal before the Cabinet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.