सर्वच सर्वेक्षणांमध्ये राज्यात युतीची आघाडी!

By admin | Published: May 12, 2014 09:54 PM2014-05-12T21:54:35+5:302014-05-13T03:16:09+5:30

लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलनुसार विविध वाहिन्या आणि सर्वेक्षण संस्थांनी महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना युतीला सर्वाधिक जागा दिल्या आहेत.

All the surveys in the state's alliance! | सर्वच सर्वेक्षणांमध्ये राज्यात युतीची आघाडी!

सर्वच सर्वेक्षणांमध्ये राज्यात युतीची आघाडी!

Next

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलनुसार विविध वाहिन्या आणि सर्वेक्षण संस्थांनी महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना युतीला सर्वाधिक जागा दिल्या आहेत.
२००९ च्या निवडणुकीत काँग्रेसने १७ जागा जिंकल्या होत्या. त्याची पुनरावृत्ती यावेळी होणार नाही आणि या पक्षाला ८ ते १० जागांचा फटका बसेल. राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्यावेळी ८ जागा जिंकल्या होत्या. या पक्षाला यावेळी तेवढ्या किंवा त्यापेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत, असा अंदाज आहे़ सीएनएन-आयबीएन आणि टाइम्स नाऊने काँग्रेस-राष्ट्रवादीला इतर सर्वेक्षणांपेक्षा अधिक जागा दाखविल्या आहेत.
गेल्यावेळी ९ जागा जिंकणार्‍या भाजपाला यावेळी सर्वात जास्त फायदा होताना दिसतो. ११ जागा जिंकणारी शिवसेनाही यावेळी फायद्यात दिसते. मनसे एका जागेसह खाते उघडेल, असे भाकित एनडीटीव्हीने वर्तविले आहे. तर आम आदमी पार्टीला केवळ एबीपी-नेल्सनने एक जागा दिली आहे. बहुजन समाज पार्टीचे खाते उघडताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा भाजपा-शिवसेना महायुतीची मतांची टक्केवारी निि›तच वाढलेली असेल, असे प्रत्येक एक्झिट पोलमध्ये दिसते. (विशेष प्रतिनिधी)
----------------------------------------------
एक्झिट पोलपेक्षाही जास्त जागा महायुतीला मिळतील. आम्ही ३५ ते ४० जागा जिंकू. केंद्र आणि राज्य सरकारच्या कुशासनाविरुद्ध कौल देतानाच राज्यातील जनतेने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर एकमुखाने विश्वास व्यक्त केल्याचे १६ तारखेला स्पष्ट होईल.
- देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष, भाजपा.
एक्झिट पोलची आकडेवारी आम्हाला मान्य नाही. १६ तारखेचा निकाल वस्तुस्थिती सांगेलच. २००९ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला जेवढ्या जागा मिळाल्या होत्या त्यापेक्षा यावेळी आम्ही फार मागे राहणार नाही.
- माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस.
----------------------------------------------------
स्रोत काँग्रेस राष्ट्रवादी भाजपा शिवसेना मनसे आप इतर
सी-व्होटर ०९ ०५ १७ १४
सीएनएन-आयबीएन आघाडी - १६ ते २२ महायुती - २३ ते २९
टाइम्स नाऊ आघाडी - २१ महायुती - २७
एबीपी-नेल्सन ०९ ०६ २१ ११ ०१
एनडीटीव्ही आघाडी - १० महायुती - ३६ ०१ ०१
आजतक/इंडिया टुडे आघाडी - ११ ते १५ महायुती - २७ ते ३५ २ ते ६

Web Title: All the surveys in the state's alliance!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.