प्रसिद्धीच्या हव्यासापोटी दमानियांची आरोपबाजी

By admin | Published: May 18, 2017 02:00 AM2017-05-18T02:00:34+5:302017-05-18T02:00:34+5:30

बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी आॅर्थर रोड तुरुंगात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांची शाही बडदास्त राखण्यात येत असल्याबाबत, सामाजिक

The allegations of Damaniya on the fame of publicity | प्रसिद्धीच्या हव्यासापोटी दमानियांची आरोपबाजी

प्रसिद्धीच्या हव्यासापोटी दमानियांची आरोपबाजी

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी आॅर्थर रोड तुरुंगात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांची शाही बडदास्त राखण्यात येत असल्याबाबत, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेले आरोप निराधार असून, केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी अशी आरोपबाजी करण्यात येत आहे. नियमानुसारच घरचा डबा मिळत असल्याचा खुलासा भुजबळांच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात करण्यात आला आहे.
भुजबळांसाठी तुरुंगात पाच फुटी टीव्ही सेट, दर दोन तासांनी फळे, चिकन मसाला वगैरे पुरविण्यात येते. शिवाय, समीर भुजबळांना तुरुंगात व्होडकाही पुरवली जात असल्याचा आरोप दमानिया यांनी मंगळवारी केला होता. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही दमानिया यांनी तुरुंग विभागाचे महानिरीक्षक भूषणकुमार उपाध्याय यांच्याकडे पत्राद्वारे केली. त्यानंतर, आज बुधवारी भुजबळांच्या वतीने या आरोपांचा समाचार घेण्यात आला आहे. छगन भुजबळ आणि समीर भुजबळ सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसारच त्यांना तुरुंगात घरचा डबा येतो. केवळ दिवसातून दोन वेळा येणारा हा डबा तुरुंग प्रशासनाने आखून दिलेल्या नियमानुसारच येतो. दर दोन तासांनी डबा येतो, हा आरोप खोटा असल्याचे भुजबळांनी स्पष्ट केले आहे.
भुजबळांच्या कोठडीबाहेर आणि तुरुंगात सर्वत्र सीसीटीव्हीची निगराणी आहे. नियमानुसार तुरुंगात कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू अथवा दारू आणता येत नाही. त्यामुळे आमच्या कोठडीत टीव्ही आहे, दारू आणली जाते, हा आरोप निराधार असून, सीसीटीव्हीद्वारे कोणीही याची शहानिशा करू शकतो, असे आव्हानच भुजबळांनी दिले. भुजबळ कुटुंबीयांना बदनाम करण्यासाठी विरोधकांच्या इशाऱ्यावरून अंजली दमानिया खोटे-नाटे आरोप करीत आहेत. अशा आरोपांच्या माध्यमातून तुरुंग प्रशासन, पोलीस आणि न्याययंत्रणेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप भुजबळांनी केला. तसेच वकिलांचा सल्ला घेऊन दमानिया यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, दमानिया यांनी केलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी तुरुंग विभागाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्यामार्फत चौकशी केली जाणार असल्याचे भूषणकुमार उपाध्याय यांनी स्पष्ट केले.

Web Title: The allegations of Damaniya on the fame of publicity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.