देशाशी ऋणानुबंध तुटलेलेच करतात असहिष्णूतेचे आरोप - मोहन भागवत

By Admin | Published: July 20, 2016 09:08 PM2016-07-20T21:08:57+5:302016-07-20T21:08:57+5:30

देशाच्या मातीशी ऋणानुबंध तुटलेले लोक असहिष्णूता वाढली असल्याचे आरोप करतात. परंतु त्यांना याची कल्पना नसते की त्यांच्या या कृतीमुळे देशाची प्रतिमा जगात

Allegations of intolerance by country's relations are broken: Mohan Bhagwat | देशाशी ऋणानुबंध तुटलेलेच करतात असहिष्णूतेचे आरोप - मोहन भागवत

देशाशी ऋणानुबंध तुटलेलेच करतात असहिष्णूतेचे आरोप - मोहन भागवत

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि.20 -  देशाच्या मातीशी ऋणानुबंध तुटलेले लोक असहिष्णूता वाढली असल्याचे आरोप करतात. परंतु त्यांना याची कल्पना नसते की त्यांच्या या कृतीमुळे देशाची प्रतिमा जगात मलिन होते. देशाशी आपण जोडले गेले आहोत हे त्या लोकांच्या लक्षात येत नाही, या शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी असहिष्णूतेचे आरोप करणाऱ्यांवर जोरदार टीका केली. प्रा.अरविंद खांडेकर लिखित ह्यऋणानुबंधह्ण या पुस्तकाच्या प्रकाशनादरम्यान ते बुधवारी नागपूरात बोलत होते.
धंतोली येथील अहिल्या मंदिरात झालेल्या या कार्यक्रमादरम्यान प्रा.अरविंद खांडेकर तसेच संस्कार भारतीचे प्रांतमंत्री आशुतोष अडोणी प्रामुख्याने उपस्थित होते. संस्कृती आणि संस्कारांशी असलेले नागरिकांचे ऋणानुबंध ही देशाची ओळख आहे. परंतु ऋणानुबंध सैल होत गेले तर देश नीट चालणार नाही. आपल्या देशाला प्रगतीकडे न्यायचे असेल तर पुढील पिढ्यांपर्यंत ही ओळख गेलीच पाहिजे, असे डॉ.भागवत म्हणाले.
देशात हिंदुत्वाच्या व्याख्येसंदर्भात अनेक वाद, चर्चा होत असतात. परंतु आमच्या दृष्टीने हिंदुत्वाचा सोपा व सरळ अर्थ म्हणजे माणुसकी व बंधुभाव असा आहे. हिंदुत्व हा धर्म आहे, परंतु त्याला इंग्रजी भाषेतील ह्यरिलिजनह्णशी जोडणे योग्य नाही. संघ सर्वांशी जुळला पाहिजे असे प्रयत्न असतात. संघातील स्वयंसेवकांना लोक पागल म्हणतात. परंतु संघाला कुणीही वाईट किंवा निरुपयोगी वाटत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वयंसेवक कधीच निराश होत नाही, असे प्रतिपादनदेखील त्यांनी केले.

सरसंघचालक २६ जुलै रोजी लंडनला जाणार
आंतरराष्ट्रीय पातळीवर संघाचे काम करणाऱ्या हिंदू स्वयंसेवक संघाच्या ह्ययुनायटेड किंगडमह्ण शाखेतर्फे संस्कृती या महाशिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात सरसंघचालक सहभागी होणार आहेत. ते २६ जुलै रोजी लंडनला जाणार आहेत. हर्टफोर्डशायर येथील या शिबीरात ते २९ ते ३१ जुलै या कालावधीत सहभागी होतील. यावेळी ते लंडनमधील विविध मान्यवरांच्यादेखील भेटी घेणार आहेत.

Web Title: Allegations of intolerance by country's relations are broken: Mohan Bhagwat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.