लोणीकरांचा मुंबईत दोनशे कोटींचा बंगला, सुरेशकुमार जेथलिया यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 04:38 AM2017-10-16T04:38:01+5:302017-10-16T04:38:23+5:30

पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर व त्यांच्या स्वीय सहायकाने मुंबईतील मलबार हिल येथे दोनशे कोटींचा बंगला गैरमार्गाने खरेदी केल्याचा आरोप काँग्रेसचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांनी रविवारी केला.

 The allegations of Lochikar's 200-crores bungalow, Sureshkumar Jethalia, in Mumbai | लोणीकरांचा मुंबईत दोनशे कोटींचा बंगला, सुरेशकुमार जेथलिया यांचा आरोप

लोणीकरांचा मुंबईत दोनशे कोटींचा बंगला, सुरेशकुमार जेथलिया यांचा आरोप

googlenewsNext

 जालना : पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर व त्यांच्या स्वीय सहायकाने मुंबईतील मलबार हिल येथे दोनशे कोटींचा बंगला गैरमार्गाने खरेदी केल्याचा आरोप काँग्रेसचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांनी रविवारी केला. विकासाच्या नावाखाली विविध योजनांच्या माध्यमातून लोणीकरांनी कोट्यवधीची बेनामी संपत्ती गोळा केली असून, या प्रकरणांची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
इंग्लडस्थित भारतीयाचा मलबारहिल येथील बंगला खरेदी केल्याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी राज्यपाल विद्यासागर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली असल्याचे
जालना जिल्हा काँग्रेसचे
अध्यक्ष जेथलिया यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. तीन वर्षांत लोणीकर यांनी कार्यकर्त्यांच्या नावावर गुत्तेदारी सुरु केली आहे. मंठा-परतूर मतदार संघात चार-चार हेडखाली एकच जलयुक्त शिवारचे निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जी कामे केली जात आहेत, त्यामध्ये लोणीकर पिता-पुत्राने कार्यकर्त्यांच्या नावावर जेसीबी व इतर यंत्रणा जुंपवली असल्याचा आरोप थेथलिया यांनी केला. परतूर व मंठा तालुक्यात दर सहा महिन्यांमध्ये पोलीस अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकाºयांच्या बदल्या केल्या जात आहेत. चांगल्या अधिकाºयांना काम करू दिले जात नाही. या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही जेथलिया यांनी केली.
लोकशाहीच्या नावाखाली ही सरंजामशाही असून याविरोधात आवाज उठविणाºयास संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार दिली असल्याचे जेथलिया यांनी सांगितले.

आरोप राजकीय द्वेषातून

मतदारसंघात होत असलेल्या विकासकामांमुळे आगामी काळात जेथलियांना त्यांचे राजकीय भवितव्य अंधारमय दिसत असून आपल्याला आलेल्या अपयशापोटी ते खोटे आरोप करत असल्याची प्रतिक्रिया बबनराव लोणीकर यांनी ‘लोकमत’ला दिली.
मुंबई येथील जमनादास मेहता लॉन साईड ६, मलबार हिल डी वॉर्ड,
मुंबई -४००००६, या मालमत्तेशी आमचा व आमच्या कार्यालयाचा
काहीही संबंध नाही. जाणीवपूर्वक चिखलफेक करण्याचा हा प्रयत्न
असून याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करीत आहे, असे लोणीकर म्हणाले.

पालकमंत्र्यांचे गाव हागणदारीमुक्तीपासून दूरच
केवळ अट्टहास म्हणून जालना जिल्हा हागणदारीमुक्त जाहीर करण्यात आला. वास्तविक पालकमंत्री बबनराव लोणीकर यांचे गाव अद्याप हागणदारीमुक्त होऊ शकलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यात काय चित्र आसेल याची कल्पनाच केलेली बरी.
स्वच्छ भारत अभियानाच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. कुठलीही कामे दर्जेदार होत नसल्याने जनतेच्या पैशाचा अपव्यय केला जात असल्याचा आरोप जेथलिया यांनी केला.

Web Title:  The allegations of Lochikar's 200-crores bungalow, Sureshkumar Jethalia, in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.