युतीतील दुरावा आणि एकोप्याला नागपुरी किनार!

By admin | Published: December 3, 2014 12:40 AM2014-12-03T00:40:21+5:302014-12-03T00:40:21+5:30

विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनाला जशी अनेक राजकीय वादळाची पार्श्वभूमी आहे तशीच भाजप आणि सेना या मित्रपक्षांमधील दुरावा आणि एकोप्याचीसुद्धा किनार आहे. शिवसेनेची तटबंदी

Alliance in the alliance and Nagpurpuri Acaite! | युतीतील दुरावा आणि एकोप्याला नागपुरी किनार!

युतीतील दुरावा आणि एकोप्याला नागपुरी किनार!

Next

चंद्रशेखर बोबडे - नागपूर
विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनाला जशी अनेक राजकीय वादळाची पार्श्वभूमी आहे तशीच भाजप आणि सेना या मित्रपक्षांमधील दुरावा आणि एकोप्याचीसुद्धा किनार आहे. शिवसेनेची तटबंदी तोडून भुजबळ व त्यांचे सहकारी बाहेर पडल्यावर नागपूर अधिवेशनातच भाजपने विरोधी पक्षनेतेपद पटकाविल्याने दोन्ही पक्षात दुरावा निर्माण झाला होता. आता नागपूरचे अधिवेशन सुरळीत पार पडावे म्हणून निवडणुकीत परस्परांच्या विरोधात लढलेले दोन्ही पक्ष एकत्र येत आहेत.
१९९१ च्या नागपूर हिवाळी अधिवेशन काळात छगन भुजबळ यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी विरोधी पक्षनेते पद हे शिवसेनेकडे होते व मनोहर जोशी विरोधी पक्षनेते होते. शिवसेनेत फूट पडल्याने त्यांची सदस्यसंख्या कमी झाली.
हीच संधी साधून भाजपने या पदावर दावा केला आणि गोपीनाथ मुंडे विरोधी पक्षनेते झाले. भाजपच्या या खेळीमुळे शिवसेनेत नाराजी होती व त्यातून दुरावाही निर्माण झाला होता. मात्र गोपीनाथ मुंडे यांनी विरोधी पक्षनेता म्हणून संपूर्ण राज्य पालथे घातले व १९९५ मध्ये युतीची सत्ता आणण्यात मोठे योगदान दिले होते. त्यानंतर १५ वर्षे विरोधी पक्षात बसल्यावर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र निवडणुका लढतील असे वाटत असतानाच युती दुभंगली. दोन्ही पक्ष परस्पराशी कट्टर शत्रूप्रमाणे लढले. निवडणुकीत भाजप बहुमताचा आकडा पार करू न शकल्याने ते शिवसेनेच्या मदतीने सत्ता स्थापन करेल असे वाटत असतानाच ‘राष्ट्रवादी’च्या मदतीने शिवसेनेची कोंडी करण्याचे प्रयत्न झाले. त्यातून दोन्ही पक्षातील दुरावा आणखी वाढला. मात्र हा दुरावा संपवून दोघांमध्ये मनोमिलन घडवून आणण्यासाठी नागपूर हिवाळी अधिवेशनच कारणीभूत ठरले. अल्पमतातील सरकार, राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळे होणारी टीका आणि शिवसेनेसारखा आक्रमक विरोधी पक्ष पुढे असेल तर अधिवेशनाला तोंड देणे अवघड असल्याचे लक्षात आल्यावरच भाजपने पुन्हा शिवसेनेशी मैत्रीचा हात पुढे केला. आता हे दोन्ही एकत्रितपणे अधिवेशनाला सामोरे जातील. युतीतील दुरावा आणि एकोप्याला असलेली नागपुरी किनार ही अशी आहे.

Web Title: Alliance in the alliance and Nagpurpuri Acaite!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.