युती तोडणा:यांना भांडी घासायला लावणार!
By admin | Published: October 5, 2014 02:14 AM2014-10-05T02:14:15+5:302014-10-05T02:14:15+5:30
राज्यात 25 वर्षापासून असलेली युती तोडण्याचे स्वप्न घेऊन दिल्लीतून एक नेता अफझलखानी विडा घेऊन महाराष्ट्रात आला होता.
Next
>रत्नागिरी : राज्यात 25 वर्षापासून असलेली युती तोडण्याचे स्वप्न घेऊन दिल्लीतून एक नेता अफझलखानी विडा घेऊन महाराष्ट्रात आला होता. त्याने युती तोडली व महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला. शिवसेनेचा विश्वासघात केला, असा घणाघाती आरोप करतानाच भाजपाने युती का तोडली, कोणासाठी तोडली हे आता स्पष्ट करावे, असे आव्हान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रत्नागिरीत शनिवारी पत्रपरिषदेत भाजपाला दिल़े युती तोडणा:यांना निवडणुकीनंतर राज्यातच भांडी घासायला लावू, असा इशाराही दिला.
निवडणूकपूर्व युती तुटली असली तरी निवडणुकीनंतर युती होऊ शकते असे वक्तव्य भाजपाचे नेते करीत आहेत. याबाबत विचारता, राऊत म्हणाले, असे जे कोणी भाजपा नेते म्हणत आहेत त्यांना त्यांच्या पराभवाचा अंदाज आलेला आहे. इतके वितंडवाद झाल्यानंतर व पाठीत खंजीर खुपसल्यानंतर निवडणुकीनंतर युती करू म्हणणा:यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. मात्र, ज्यांनी युती तोडण्याचे काम केले त्यांना निवडणुकीनंतर आम्ही राज्यात भांडी घासायला लावू, अशा शब्दात राऊत यांनी आपला राग व्यक्त केला.
भाजपाचे स्वपA पूर्ण
होऊ देणार नाही
महाराष्ट्र राज्य तोडण्यासाठीच भाजपाने युती तोडली, असा आरोप करीत त्यांना विदर्भ महाराष्ट्रातून वेगळा करायचा आहे. राज्य तोडायचे हेच त्यांचे स्वप्न आहे. मात्र, राज्याची शकले करण्यास शिवसेनेचा विरोध आहे. त्यामुळेच युती तोडली गेली. मात्र, राज्यातील जनता महाराष्ट्र तोडण्याचे हे भाजपाचे स्वप्न कधीच पूर्ण होऊ देणार नाही. मुंबईतून महाराष्ट्राची सत्ता चालेल, दिल्लीतून नाही, असा टोलाही राऊत यांनी लगावला.