युती-आघाडीत सामना टफ

By admin | Published: September 15, 2014 01:05 AM2014-09-15T01:05:56+5:302014-09-15T01:05:56+5:30

जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापतीची निवडणूक रविवारी पार पडली. यात काँग्रेसला ४, राष्ट्रवादी काँग्रेस २, भाजप ४ तर शिवसेनेला ३ ठिकाणी यश मिळाले. विधानसभा

Alliance-Fronted Tough Tough | युती-आघाडीत सामना टफ

युती-आघाडीत सामना टफ

Next

पं.स.सभापती निवडणूक काँग्रेस-४ राष्ट्रवादी-२ भाजप-४ शिवसेना-३
नागपूर : जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापतीची निवडणूक रविवारी पार पडली. यात काँग्रेसला ४, राष्ट्रवादी काँग्रेस २, भाजप ४ तर शिवसेनेला ३ ठिकाणी यश मिळाले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रंगलेल्या या सामन्यात भाजप-सेना युती व काँग्र्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा सामना टफ राहिला.
जिल्ह्यांचे लक्ष लागलेल्या व भाजपच्या ताब्यातील सावनेर पं.स.वर काँग्रेसचा झेंडा फडकला. १२ सदस्यांपैकी ६ काँग्रेस ,५ भाजप व १ अपक्ष असे संख्याबळ आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने अपक्षाच्या मदतीने सत्ता हस्तगत केली होती. यावेळी केदार गटाने मोर्चेंबांधणी करून अपक्षाच्या मदतीने सत्ता काबीज केली.
उमरेड पंचायत समितीत ६ पैकी ३ भाजप , २ बसपा व १ काँग्रेसचा सदस्य आहे. गेल्यावेळी बसपाचा सभापती होता. यावेळी बसपा व काँग्रेस सदस्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याने सभापती व उपसभापतीपदी भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. बहिष्कारासाठी पडद्याआड सौदेबाजी झाल्याची चर्चा आहे.
हिंगणा पंचायत समितीत राष्ट्रवादीचे सभापती व उपसभापती बिनविरोध निवडून आले. माजी मंत्री रमेश बंग गटाने यावेळीही सत्ता कायम ठेवली आहे. काटोलात अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांच्या गटाला ईश्वरचिठ्ठीने तारले. येथे सभापती राष्ट्रवादीचा तर उपसभापती भाजपचा निवडून आला. नरखेड पंचायत समितीत शिवसेनेचे सभापती राजेंद्र हरणे तर भाजपच्या उपसभापती माया दुरुगकर यांची फेरनिवड करण्यात आली.
कुही पंचायत समितीत शिवसेना बंडखोर सदस्यांच्या मदतीने काँग्रेसने सत्ता कायम ठेवली. कामठी येथे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गटाने सत्ता कायम ठेवली आहे. परंतु विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मौद्यात जोर लावल्यानंतरही भाजपला पराभव स्वीकारावा लागला. अटीतटीच्या सामन्यात शिवसेनेने राष्ट्रवादीच्या मदतीने सत्ता काबीज केली.
भिवापूर, कळमेश्वर व कुही पंचायत समितीत काँग्रेसने सत्ता कायम ठेवण्यात यश मिळवले. नागपूर पंचायत समितीच्या अटीतटीच्या निवडणुकीत आमदार विजय घोडमारे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.अटीतटीच्या सामन्यात ६ विरुद्ध ५ च्या फरकाने भाजपने पुन्हा बाजी मारली. (प्रतिनिधी)
काँग्रेस, भाजपचे संख्याबळ वाढले
सभापतिपदाच्या निवडणुकीत संख्याबळाचा विचार करता काँग्रेस, भाजपचे प्रत्येकी ४, राष्ट्रवादी २ तर शिवसेनेचे ३ सभापती निवडून आले आहे. गेल्यावेळी काँग्रेस, भाजपचे प्रत्येकी ३ तर सेनेचे ४ सभापती होते. एका ठिकाणी बसपाचा सभापती होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ कायम आहे. काँग्रेस, भाजपचा प्रत्येकी १ सभापती वाढला आहे.

Web Title: Alliance-Fronted Tough Tough

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.