दर्यापूरात भाजप की सेना; जागावाटपात युतीच्या नेत्यांची कसोटी लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2019 03:18 PM2019-09-03T15:18:00+5:302019-09-03T15:25:45+5:30

दोन्ही पक्षातील नेते या जागेवर आपला दावा करत आहेत.

Alliance leaders Claim in Daryapur Constituency | दर्यापूरात भाजप की सेना; जागावाटपात युतीच्या नेत्यांची कसोटी लागणार

दर्यापूरात भाजप की सेना; जागावाटपात युतीच्या नेत्यांची कसोटी लागणार

Next

मुंबई - विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजप-शिवसेना यांच्यातील युतीच्या हालचालींना सुद्धा वेग आला आहे. भाजप-शिवसेनेतील जागावाटपाचा निर्णय लवकरच मार्गी लागण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र असे असले तरीही दर्यापूर विधानसभा मतदारसंघात जागावाटपावरून दोन्ही पक्षातील नेत्यांची दमछाक होणार असल्याचे बोलले जात आहे. २००९ पर्यंत हा मतदारसंघ सलग पाच वेळेपासून सेनेच्या ताब्यात होत्या. तर गेल्यावेळी भाजपचे रमेश बुंदिले हे येथून निवडून आले आहेत. मात्र युतीतील दोन्ही पक्षातील नेते या जागेवर आपला दावा करत आहेत.

अंजनगाव सुर्जी, दर्यापूर आणि अचलपूर तालुक्यातील काही भाग मिळून दर्यापूर मतदारसंघ बनलेला आहे. १९९० पासून या मतदारसंघात शिवसनेने सलग पाचवेळा मतदारसंघातील नेतृत्व केलं आहे. माजी आमदार प्रकाश भारसाखळे  हे शिवसेनकडून सलग चारवेळा निवडणून आले होते. मात्र २००९ मध्ये हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव झाला आणि त्यावेळी अभिजित अडसूळ यांनी शिवसेनकडून निवडणूक लढवत सेनेचा बालेकिल्ला कायम ठेवला. मात्र २०१४ मध्ये भाजप-शिवसेना वेगवेगेळे लढले व भाजपचे उमेदवार रमेश बुंदिले हे विजयी झाले.

त्यामुळे आता आगामी निवडणुकीत दोन्ही पक्षातील नेते या मतदारसंघावर दावा करत आहे. युतीत ही जागा शिवसेनेकडे असून, १९९० ते २००९ पर्यंत सलग पाचवेळा सेनेचा उमेदवार निवडणून आला असल्याने हा मतदारसंघ युतीच्या जागावाटपावेळी सेनेला सोडण्याची मागणी शिवसैनिक करत आहेत. तर विद्यमान जागांमध्ये बदल होणार नसल्याचे वक्तव्य खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केल्याने, भाजपच्या इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी दर्यापूर मतदारसंघ भाजपकडेच राहणार असल्याचा दावा केला आहे.

त्यामुळे जागावाटपात हा मतदारसंघ आपल्याकडेच राहावा यासाठी स्थानिक नेत्यांनी थेट मुंबईपर्यंत सूत्र हलवलेले असल्याचे बोलले जात आहे. तर दर्यापूर मतदारसंघ आपल्याच ताब्यात असावा यासाठी दोन्ही पक्षातील महत्वाचे नेते सुद्धा आग्रही असल्याचे सुद्धा चर्चा पाहायला मिळत आहे. मात्र ऐनवेळी ही जागा कुण्याच्या पदरात पडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Web Title: Alliance leaders Claim in Daryapur Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.