युती केवळ मुंबई-ठाण्यापुरतीच
By Admin | Published: January 12, 2017 04:54 AM2017-01-12T04:54:42+5:302017-01-12T04:54:42+5:30
दहा महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी भाजपासोबत युती करण्यास शिवसेनेचे पक्षप्रमुख
यदु जोशी / मुंबई
दहा महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी भाजपासोबत युती करण्यास शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनुकूलता दर्शविली असली तरी, केवळ मुंबई आणि ठाण्यापुरतीच युती करण्याचा पवित्रा भाजपाने घेतला आहे. अन्य महापालिका व जिल्हा परिषदांच्या बाबतीत स्थानिक पदाधिकाऱ्यांना युती करण्याबाबतचे अधिकार देण्याचे भाजपाने ठरविले आहे. शिवसेनेला मात्र सर्वत्रच भाजपाशी हवी युती हवी असली तरी ठाणे व मुंबई महापालिका सेनेसाठी प्रतिष्ठेच्या आहेत. त्यामुळे त्या जिंकण्यासाठी युती झाली तरी सेनानेते त्यास तयार होतील, असे दिसते. युतीसाठी माझ्याकडे एक फॉर्म्युला असून दोन्ही पक्षाचे निवडक तीन नेत्यांसोबत त्यावर चर्चा होऊ शकते. मात्र, अंतिम निर्णय मी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा असेल, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सांगितले. मात्र, रात्री उशीरापर्यंत भाजपाकडून चर्चेचा प्रस्ताव गेला नव्हता.
उलट, स्थानिक पालकमंत्री, मंत्री, जिल्हाध्यक्ष, संघटन मंत्री वा ज्येष्ठ आमदारांचा समावेश असलेली एक समिती तयार करून स्थानिक शिवसेना पदाधिकारी, नेत्यांशी युतीबाबत चर्चा करावी, असे आदेश प्रदेश भाजपाकडून देण्यात आले आहेत.
आज भाजपाची ठाण्यात बैठक
भाजपाच्या प्रदेश कार्यसमितीची बैठक गुरुवारी ठाणे येथे होणार आहे. या बैठकीत फक्त पदाधिकारी बैठक वगळता अन्य
तीन सत्र आणि समारोपाचे सत्रदेखील पत्रकारांसाठी खुले असेल. पत्रकारांना मज्जाव केल्यास उलटसुलट बातम्या येण्याऐवजी ‘लाईव्ह रिपोर्टिंग’ करू दिलेले चांगले असा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.