युती एकवटली, विरोधक विखुरले

By Admin | Published: February 17, 2016 01:47 AM2016-02-17T01:47:54+5:302016-02-17T01:47:54+5:30

२०१४ मधील विधानसभा निवडणुकीच्या वेळी सर्वत्र मोदी लाट होती. त्यामुळे भाजप आणि सेना यांची युती नव्हती. त्यामुळे सेना-भाजप परस्परांसमोर उभे ठाकले होते

Alliance united, the opponents scattered | युती एकवटली, विरोधक विखुरले

युती एकवटली, विरोधक विखुरले

googlenewsNext

पालघर : दि. १६- २०१४ मधील विधानसभा निवडणुकीच्या वेळी सर्वत्र मोदी लाट होती. त्यामुळे भाजप आणि सेना यांची युती नव्हती. त्यामुळे सेना-भाजप परस्परांसमोर उभे ठाकले होते. त्यातच बविआ, माकप, मनसे, बसपा यांचेही उमेदवारही रिंगणात होते. अशा स्थितीतही शिवसेनेच्या कृष्णा घोडा यांनी ४६१५२ मते व ५१५ मतांचे अधिक्य मिळवून विजय मिळविला होता.
२०१४च्या निवडणुकीत काँग्रेसच्या गावितांना ४५६२७, भाजपाच्या डॉ. गौड यांना ३४१४९ तर बविआच्या मनिषा निमकर यांना २३७३८, माकपाच्या उमेदवाराला ६५००, मनसेला ३१४८, तर बसपाला १९०० मते मिळाली होती. या निकालाचा अन्वयार्थ लक्षात घेऊन या पोटनिवडणुकीत भाजपाने सेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे धोरण स्वीकारून युतीच्या मतांची फाटाफूट टाळली होती. त्याचा फायदा युतीला म्हणजे अमित घोडा यांना झाला आणि त्यांचे मताधिक्य ५१५ वरून एकदम २०९८७ वर गेले.
एकीकडे युतीची मते एकवटलेली असतांना काँग्रेसने मात्र बविआशी काही समझोता करून ही लढत एकास एक अशी सरळ घडवून आणण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते. ते न झाल्यामुळे युती विरोधातील मतांची फाटाफूट झाली. त्याचा परिणाम अमित घोडा यांची मते, मताधिक्य वाढून ते विजयी होण्यात झाला. निमकर जर या लढतीत नसत्या तर त्यांची ३६७८१ मते गावित आणि घोडा यांच्यात विभागली गेली असती अशा स्थितीत कोण विजयी झाले असते हे सांगता येणे कठिण झाले असते. परंतु तसे झाले नाही.
१निमकर आणि गावित यांना आपली मते गत निवडणुकीच्या तुलनेत काहीशी वाढली. एवढ्यावरच यावेळी समाधान मानावे लागले आणि विजयश्रीने आपल्याला कशी हुलकावणी दिली ते ही पहावे लागले. जो राजकीय शहाणपणा सेना-भाजपाने दाखविला तो काँग्रेस आणि बविआने दाखविला असता तर या निवडणुकीचे चित्र निश्चितच वेगळे दिसले असते. या निवडणुकीतील राजकीय व्यूहरचनेत काँग्रेस आणि बविआ कमी पडलेत, अशी प्रतिक्रिया काँग्रेसमध्ये व्यक्त होते आहे.
२गावित आणि निमकर यांनी जरी मते वाढल्याचा दावा केला असला तरी सत्तेच्या राजकारणात तुलनात्मक मतवाढीपेक्षा जयापजयाला अधिक महत्व असते. याचे भान युती विरोधकांनी राखले नाही. या निवडणुकीत मनसे आणि बविआ यांचे उमेदवार नव्हते. मार्क्सवादी काहीसे निष्प्रभ झालेले त्यामुळे सेना-भाजप, काँग्रेस बविआ हे चारच पक्ष प्रभावी होते.
३जशी सेना-भाजपने एकत्र येण्याची राजकीय धूर्तता दाखविली तशीच धूर्तता काँग्रेस आणि बविआने दाखविली असती तर निश्चितच या निवडणुकीच्या निकालाचे चित्र बदलले असते. या पुढच्या निवडणुकांत तरी अशी धूर्तता काँग्रेस दाखवेल, अशी अपेक्षा व्यक्त होते आहे.

Web Title: Alliance united, the opponents scattered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.