युती : कोणाची ताकद किती?

By Admin | Published: September 20, 2014 03:46 AM2014-09-20T03:46:48+5:302014-09-20T03:46:48+5:30

विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून महायुतीतील शिवसेना-भाजपा या दोन प्रमुख पक्षांचे संबंध ताणले गेले आहेत. पंचवीस वर्षाच्या राजकीय संसाराची काडीमोड होईल की, काय अशी परिस्थिती आहे.

Alliance: Whose strength is? | युती : कोणाची ताकद किती?

युती : कोणाची ताकद किती?

googlenewsNext
विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून महायुतीतील शिवसेना-भाजपा या दोन प्रमुख पक्षांचे संबंध ताणले गेले आहेत. पंचवीस वर्षाच्या राजकीय संसाराची काडीमोड होईल की, काय अशी परिस्थिती आहे. लोकसभा निवडणुकीतील यशामुळे दोन्ही पक्षांच्या आकांशा वाढल्या असून आपलेही ‘अच्छे दिन’ येतील, या अपेक्षेने अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी एकमेकांची ताकद आजमावली जात आहे. कदाचित हा दबावतंत्रचाही भाग असू शकतो. पंचवीस वर्षापासून शिवसेना अधिक जागा लढवित आहे. 2क्क्9च्या निवडणुकीत शिवसेनेने 169 तर भाजपाने 119 जागा लढविल्या होत्या. त्यापैकी सेनेकडील 69 तर भाजपाकडील 19 जागांवर आजवर दोघांनाही अद्याप विजय मिळालेला नाही.  त्यामुळे जागांच्या अदलाबदलीची मागणी होत आहे. या सर्व घडामोडीच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्रात खरेच कोणाची किती ताकद आहे, याचा जिल्हावार घेतलेला आढावा.
 
नागपूर
सेनेपेक्षा भाजपा भारी
 नागपूर मनपा, जिल्हा परिषद, पंचायत समितीत भाजपा-सेनेची युती आहे. या तिन्ही ठिकाणी युतीची सत्ता आहे. मात्र या दोन्ही पक्षांचा काडीमोड झाल्यास नागपुरात भाजपाची ताकद शिवसेनेपेक्षा जवळपास दुप्पट असल्यामुळे भाजपाला फार फरक पडणार नाही.
 
भाजपाचे सात आमदार
जिल्ह्यातील 12 विधानसभा क्षेत्रंपैकी भाजपाचे सात आमदार आहेत, तर सेनेचा केवळ एक आमदार आहे.
 
भंडारा
युतीचे दोन आमदार
भंडारा जिल्ह्यात तीन तुमसर, भंडारा, साकोली ही विधानसभा क्षेत्रे आहेत. 2क्क्9 च्या निवडणुकीत तीनपैकी भाजपाने दोन तर शिवसेनेने एका जागेवर निवडणूक लढविली होती. त्यात साकोली आणि भंडा:याची जागा युतीने जिंकली होती.
 
कार्यकर्ते संभ्रमात
महायुतीचा तिढा न सुटल्यामुळे भंडारा जिल्ह्यातील भाजपा आणि शिवसेना कार्यकत्र्यामध्ये संभ्रम आहे.
 
वर्धा
 दोन्ही पक्ष सज्ज
जिल्ह्यात हिंगणघाट, देवळी, आर्वी आणि वर्धा असे चार विधानसभा मतदार संघ आहेत. हिंगणघाट शिवसेनेच्या, तर आर्वी भाजपाच्या ताब्यात आहे. गेल्या निवडणुकीत वर्धा मतदारसंघ शिवसेनेच्या तर देवळी भाजपाच्या वाटय़ाला होता. 
 
दोन्हीकडे पराभव
युती असतानाही या दोन्ही मतदारसंघांत युतीच्या उमेदवारांना पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. 
 
चंद्रपूर
भाजपासाठी अनुकूल
सहा विधानसभा मतदारसंघ असलेल्या चंद्रपूर या जिल्ह्यात भाजपा- शिवसेना युतीमध्ये भाजपाकडे चंद्रपूर, बल्लारपूर, ब्रrापुरी आणि चिमूर या चार विधानसभेच्या जागा आहेत; तर शिवसेनेकडे फक्त वरोरा आणि राजुरा या दोन जागा आहेत.
 
दोन जागांवर अपयश
शिवसेनेला वरोरा आणि राजुरा विधानसभा मतदारसंघांत आजर्पयत कधीही यश मिळालेले नाही.
 
शिवसेनेला वरोरा आणि राजुरा विधानसभा मतदारसंघांत आजर्पयत कधीही यश मिळालेले नाही.
 
गोंदिया
भाजपावर परिणाम नाही
गोंदिया जिल्ह्यातील चार मतदारसंघांपैकी तीन ठिकाणी युतीमधील घटक पक्षापैकी भाजपाचे उमेदवार उभे केले जातात. केवळ गोंदिया हा एकमेव मतदारसंघ सेनेकडे होता. परंतु हा मतदारसंघही सेनेकडून आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपाने यावेळी जोरदार फिल्डिंग लावली आहे.
 
दमछाक होणार
युती तुटल्यास बेसावध असलेल्या शिवसेनेची सर्व ठिकाणी उमेदवार उभे करताना दमछाक होणार आहे.
 
अकोला
भारिपला लाभ होणार
अकोला जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांपैकी अकोला पूर्व आणि बाळापूर मतदारसंघ भारिप-बहुजन महासंघाच्या ताब्यात आहे. अकोला पश्चिम आणि अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला मूर्तिजापूर मतदारसंघ भाजपाच्या, तर आकोट मतदारसंघात सेनेचा आमदार आहे. 
 
स्वतंत्र लढले तर..
युती स्वतंत्रपणो लढली तर हिंदू मतांचे विभाजन होऊन, त्याचा फायदा काँग्रेस व भारिपला होण्याची शक्यता आहे.  
 
बुलढाणा
दोन्ही पक्षांची ताकद
बुलडाणा, सिंदखेड राजा व मेहकर हे तीन विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटय़ाला आहेत. सिंदखेड राजाचा अपवाद वगळला, तर बुलडाणा व मेहकरमध्ये सेनेचे साम्राज्य अबाधित आहे. या मतदारसंघात भाजपाचे स्थान नगण्य असेच आहे.
 
चार जागा भाजपाकडे
खामगाव, चिखली, मलकापूर आणि जळगाव जामोद या चार मतदारसंघांत भाजपाची ताकद आहे
 
वाशिम
भाजपाचा प्रभाव
वाशिम जिल्ह्यातील विधानसभेच्या 
तीन मतदारसंघांपैकी दोन मतदारसंघ भाजपाच्या तर 
एक मतदारसंघ शिवसेनेच्या वाटय़ाला आहे. अनुसूचित जातीसाठी उमेदवारासाठी राखीव असलेला वाशिम मतदारसंघ भाजपाचा गड मानला जातो.
 
सेनेकडे एक मतदारसंघ
 कारंजा हा एकमेव मतदारसंघ शिवसेच्या वाटय़ाला आहे. कारंजा व मानोरा तालुक्याचा यात समावेश आहे.
 
अमरावती
उमेदवार नाहीत
जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी अमरावती, धामणगाव रेल्वे, मोर्शी व मेळघाट हे भाजपाच्या तर बडनेरा, दर्यापूर, तिवसा आणि अचलपूर हे मतदारसंघ शिवसेनेच्या वाटय़ाला आहेत. अमरावती शहरात दोन्ही पक्षांकडे उमेदवार नाहीत.
 
सेनेचा एक आमदार
एससी राखीव असलेल्या दर्यापुरातच केवळ सेनेचा आमदार आहे. काँग्रेस चार, अपक्ष तीन, भाजपा शून्य आहे.
 
गडचिरोली
शिवसेनेला फटका
गडचिरोली जिल्ह्यात शिवसेनेपेक्षा भाजपाची ताकद अधिक आहे. तीन मतदार संघांपैकी दोन मतदारसंघ (गडचिरोली आणि अहेरी) भाजपाकडे तर एक (आरमोरी) शिवसेनेकडे आहे. विद्यमान स्थितीत सेना भाजपा स्वबळावर लढल्यास शिवसेनेला प्रचंड फटका येथे बसण्याची शक्यता आहे.
 
भाजपाचे अधिक बळ
शिवसेनेचे दोन जि.प. व तीन पं.स. सदस्य आहेत. भाजपाचे 1क् जि.प. व जवळजवळ 25 च्या आसपास पं.स. सदस्य आहेत. 
 
जळगाव
दोन्ही पक्षांची वाट बिकट
सेना आणि भाजपा हे स्वतंत्रपणो लढले तर दोघांची वाट बिकट आहे. युतीत शिवसेनेकडे चोपडा, भुसावळ, एरंडोल, पाचोरा, जळगाव शहर आणि जळगाव ग्रामीण हे मतदारसंघ होते. तर भाजपाकडे अमळनेर, रावेर, मुक्ताईनगर, जामनेर आणि चाळीसगाव हे मतदारसंघ आहेत.
 
दोघांचेही नुकसान
भाजपाकडील मतदारसंघात शिवसेनेने ताकद वाढविली नाही तर सेनेकडे असलेल्या जागांवर भाजपाची ताकद नाही.
 
नांदेड
भाजपाला फटका
 लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपाच्या वाटय़ाला असली तरी जिल्ह्यात भाजपाची म्हणावी तेवढी ताकद नाही़ विधानसभेतही सेनेकडे सात तर भाजपाच्या वाटय़ाला केवळ दोन जागा आहेत़ त्यात 1965 पासून विधानसभा निवडणुकीत भाजपाला दोन वेळा यश मिळाले आह़े 
 
नऊ वेळा संधी
आतार्पयत शिवसेनेच्या एकूण 
नऊ उमेदवारांना विधानसभेत जाण्याची संधी मिळाली़ 
 
परभणी
भाजपाला कठीण जाणार
परभणी जिल्ह्याचा विचार केला असता जिल्ह्यात शिवसेना मजबूत स्थितीत असून, युती तुटल्यास सेनेला त्याचा फटका बसणार नाही. उलट गंगाखेडमध्ये भाजपाला युती तुटल्याचा फटका बसू शकतो. जिल्हा परिषदेत भाजपाचे केवळ दोन तर शिवसेनेचे 8 सदस्य आहेत.  
 
सेनेची ताकद
परभणी, पाथरी व जिंतूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची चांगली ताकद आहे.
 
धुळे
दोघांची ताकद वेगवेगळी
युती दुंभगल्यास धुळे जिल्ह्यातील शिवसेना- भाजपाच्या स्थितीवर कुठलाही परिणाम जाणवणार नाही. युतीच्या जागावाटपातील धुळे शहर व धुळे ग्रामीण मतदारसंघात शिवसेनेचा प्रभाव आहे. तुलनेत शिंदखेडा, शिरपूर, साक्री मतदारसंघांत भाजपाचा प्रभाव आहे. 
 
शिवसेनेचे बळ
मनपात 7क् पैकी केवळ 3 भाजपाचे, 
तर शिवसेनेचे 11 सदस्य आहेत. युती तुटल्यास भाजपाचे नुकसान होईल.
 
नंदुरबार
युतीची ताकद नाही
जिल्ह्यात एकूण चार विधानसभा मतदारसंघ आहेत. नंदुरबार आणि नवापूर हे दोन विधानसभा मतदारसंघ भाजपाकडे आहेत, तर शहादा आणि अक्कलकुवा या दोन जागा शिवसेनेच्या कोटय़ात आहेत. नंदुरबार जिल्ह्यात सध्या युतीचा एकही आमदार नाही.
 
गावितांचा प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते डॉ. विजयकुमार गावित यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने पक्षाची ताकद वाढली आहे.
 
जालना
सेनेकडे तीन जागा
पाच विधानसभा मतदारसंघांत शिवसेना, भाजपाचे प्रबळ इच्छुक उमेदवार स्वबळावर लढण्यास सज्ज झाले असले, तरी या मतदारसंघात परंपरागत तीन जागा सेनेकडे तर दोन जागा भाजपाकडे आहेत. या दोन्ही पक्षांतील इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीसाठीची मागणीही केली आहे.
 
उमेदवार नाहीत
स्वतंत्र लढल्यास जालना व घनसावंगीत भाजपाला, बदनापूर, भोकरदन व परतूरमध्ये सेनेला उमेदवार शोधावे लागतील.
 
उस्मानाबाद
सेना शक्तिमान
जिल्हा परिषदेत 54 सदस्य आहेत. यात काँग्रेसकडे 2क्, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 19, शिवसेनेकडे 13 तर भाजपाकडे अवघे 2 सदस्य आहेत. पंचायत समित्यांतील या चार पक्षांचे बळ पाहिले असता काँग्रेसकडे 37, राष्ट्रवादीकडे 41, सेना 24 आणि भाजपाकडे केवळ 7 संख्याबळ आहे.
 
दोघांचेही नुकसान
शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यास सेनेसह भाजपालाही  फटका बसण्याचीच शक्यता आहे. 
 
नाशिक
भाजपाची पंचाईत
वाटय़ाला आलेल्या 5 पैकी केवळ एका जागेवर आपला माणूस निवडून आणू शकलेल्या भाजपाला जिल्ह्यातील 15 पैकी 8 जागांवर उमेदवार मिळणो कठीण जावे अशी स्थिती. सेना त्यापेक्षा बरी असली तरी मुस्लिमबहुल मध्य मालेगावात पडण्यासाठीही सेनेकडे उमेदवार नाही. 
 
सेनेचे चार आमदार
सेनेकडे 1क् तर भाजपाकडे 5 जागा होत्या. पैकी सेनेने 4 आणि भाजपाने केवळ एक जागा जिंकली होती.
 
रायगड
शिवसेनेला पोषक
रायगड जिल्ह्यात एकूण सात विधानसभा मतदारसंघ आहेत. लोकसभेला शिवसेनेचे अनंत गिते येथे निवडून आल्याने सेनेची ताकद या ठिकाणी वाढली आहे. भाजपा-सेना युती तुटल्यास जिल्ह्यातील सातही मतदारसंघांत शिवसेना उमेदवार उभे करू शकते.
 
ठाकूर यांचा प्रवेश
काँग्रेसचे प्रशांत ठाकूर यांनी नुकताच भाजपामध्ये प्रवेश केल्याने पवनेलमध्ये पक्षाची ताकद वाढली आहे.
 
 
लातूर
भाजपाची शक्ती अधिक
पक्षीय बलाबल पाहता सहा मतदारसंघांत शिवसेनेचे सहा पंचायत समिती सदस्य, चार जिल्हा परिषद सदस्य तर 1क् नगरसेवक आहेत. तर भाजपाचे 24 पंचायत समिती सदस्य, नऊ जिल्हा परिषद सदस्य तर सात नगरसेवक असे पक्षीय बलाबल आहे. 
 
चार जागा भाजपाकडे
 लातूर जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघांत सेनेच्या वाटय़ाला फक्त दोन तर भाजपाच्या वाटय़ाला चार आहेत.
 
औरंगाबाद
शिवसेनेचे चार आमदार
 बलाबलाच्या दृष्टीने विचार केल्यास औरंगाबाद जिल्ह्यात स्वत:चे तीन आणि एक सहयोगी, असे शिवसेनेचे चार आमदार आहेत. खासदारही सेनेचाच आहे.  मनपात सत्तेसह सर्वाधिक 3क् नगरसेवक आहेत. जिल्हा परिषदेत शिवसेनेचे 18, तर भाजपाचे केवळ सहा सदस्य आहेत.
 
भाजपाचा प्रभाव नाही
भाजपाच्या वाटय़ाला फुलंब्री आणि सिल्लोड या जागा आहेत. भाजपा एकही जागा जिंकू शकेल, अशी स्थिती नाही.
 
र}ागिरी
भाजपाचा तोटा
जि.प.च्या 57 जागांपैकी 25 जागा शिवसेनेकडे आहेत, तर आठ जागा भाजपाकडे आहेत. पंचायत समितीच्या 114 जागांपैकी 58 जागा शिवसेनेकडे तर केवळ 6 जागा भाजपाकडे आहेत. युती तुटण्याचा सर्वात जास्त तोटा भाजपाचा होईल. 
 
ताकद नाही
जिल्ह्यातील पाच मतदारसंघांमध्ये  भाजपाकडे स्वबळावर निवडून येण्याइतकी ताकद नाही. 
 
मुंबई शहर
युतीचे उमेदवार धोक्यात
महायुती दुभंगली तरी शिवसेना व भाजपाने स्वतंत्रपणो उमेदवार उभे केल्यास आघाडीच्या उमेदवारांना जीवनदान ठरणार आहे. दक्षिण मुंबईत असलेल्या 6 पैकी सध्याच्या 4 जागा राखण्याबरोबरच भाजपाची मलबार हिलची जागा धोक्यात येणार आहे.
 
गवळी इच्छुक
अरुण गवळीकन्या गीता सेनेकडून इच्छुक असून, भाजपाबरोबर काडीमोड झाल्यास तिची उमेदवारी नक्की होईल.
 
बीड
भाजपाचा वरचश्मा
शिवसेना आणि भाजपाची युती तुटल्यानंतर त्याचा फटका शिवसेनेलाच बसणार आहे. जिल्ह्यात सहा मतदारसंघ असून, बीड मतदारसंघ वगळता इतर ठिकाणी सेनेचे अस्तित्व केवळ नावालाच आहे. केवळ एकच बीडची जागा शिवसेनेच्या वाटय़ाला आली आहे.
 
नावापुरतेच अस्तित्व
परळी, गेवराई, माजलगाव, आष्टी 
आणि केज या मतदारसंघांत शिवसेनेचे अस्तित्व केवळ नावापुरते आहे.
 
हिंगोली
शिवसेना प्रभावी
जिल्ह्यात एकूण तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी कळमनुरी आणि वसमत शिवसेनेकडे आहे तर हिंगोली मतदारसंघ भाजपाकडे आहे. जिल्ह्यात शिवसेनेची ताकद अधिक असल्याने युती तुटल्यास याचा भाजपाच्या एकमेव मतदारसंघावर परिणाम होणार आहे.
 
एकही आमदार नाही
2क्क्9 च्या निवडणुकीत जिल्ह्यातील एकही जागा भाजपा किंवा शिवसेनेच्या उमेदवाराला जिंकता आलेली नाही.
 
सिंधुदुर्ग
राणो यांना लाभ
राज्यातील सेना-भाजपाची युती तुटल्यास सिंधुदुर्ग जिल्हय़ात त्याचा सर्वाधिक फायदा काँग्रेसला पर्यायाने नारायण राणो यांना होणार आहे. जिल्हय़ात अस्तित्वाची लढाई लढणा:या राणोंना ही निवडणूक सोपी होणार आहे.
 
पोषक वातावरण
लोकसभेला नीलेश राणो यांच्या पराभवानंतर युतीसाठी जिल्हय़ात चांगले वातावरण आहे. 
 
ठाणो
शिवसेनेचा गड
जिल्ह्याच्या विभाजनांतर सध्या एकूण 18 विधानसभेच्या जागा आहेत. यापैकी बहुतेक मतदारसंघांत युतीचे आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीत येथे जवळपास सर्वच मतदारसंघांत महायुतीला आघाडी मिळाली आहे. हा जिल्हा शिवसेनेला गड मानला जातो.
 
बविआलाही लाभ
युती तुटल्यास काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि वसईत बहुजन विकास आघाडीचे चांगलेच फावणार आह़े 
 
मुंबई
भाजपासाठी कठीण
महायुती दुभंगून शिवसेना - भारतीय जनता पक्षात आमनेसामने लढत झाल्यास पूर्व उपनगरांमध्ये चुरशीच्या व अत्यंत अटीतटीच्या लढती होतील. यात मुलुंड, घाटकोपर अशा भाजपाच्या अभेद्य किल्ल्यांना खिंडार पडू शकते. याचा फटका मनसेलाही बसू शकतो. 
 
शिवसेनेचे आव्हान
या निवडणुकीत मनसे फॅक्टर ढिला पडल्याने शिवसेना स्वबळावर आघाडीच्या उमेदवारांना आव्हान देऊ शकते.
 
पालघर
शिवसेनेचा प्रभाव
ठाणो जिल्ह्याचे विभाजन करून नुकताच नव्याने झालेला जिल्हा म्हणून पालघरची ओळख आहे. येथे विधानसभेच्या एकूण 18 जागा आहेत. यापैकी बहुतेक जागांवर शिवसेनेची पकड आहे. परंतु महायुती तुटल्यास एक जागा वगळता इतर उमेदवारांना निवडणूक कठीण जाणार आहे.
 
युतीचे वर्चस्व
पालघर आणि ठाणो परिसरातील भिवंडी पश्चिम आणि मुंब्रा-कळवा वगळता इतर ठिकाणी युतीचे वर्चस्व आहे.
 
सोलापूर
‘आयाराम’मुळे सेना प्रभावी
सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभेच्या जागांपैकी युतीत 8 जागा सेनेकडे तर 3 जागा भाजपाकडे होत्या. गेल्या विधानसभेत शिवसेनेचा एकही आमदार निवडून आला नाही. याउलट भाजपाने दोन जागा जिंकल्या होत्या. मातब्बर नेत्यांनी सेनेत प्रवेश केल्यामुळे सेनेची ताकद वाढली आहे.
 
उमेदवारांचा अभाव
शहरात भाजपा-सेनेची समसमान ताकद आहे, परंतु ग्रामीण भागात भाजपाला उमेदवार शोधावे लागतील.
 
सांगली
भाजपाचे तीन आमदार
स्वबळावर लढण्यासाठी भाजपा-शिवसेनेकडे सांगली जिल्ह्यात सर्वच्या सर्व म्हणजे आठही मतदारसंघांत प्रबळ उमेदवार नाहीत. संभाजी पवार (सांगली), सुरेश खाडे (मिरज), प्रकाश शेंडगे (जत) हे भाजपाचे विद्यमान आमदार आहेत. सांगली, जतमध्ये त्यांच्याकडे इच्छुकांची गर्दी आहे.
 
सेनेकडे उमेदवार नाहीत
जिल्ह्यात भाजपाच्या तुलनेत शिवसेनेची उमेदवार उभे करण्याची ताकद अत्यंत कमी आहे.
 
सातारा
भाजपाकडे तगडी फौज
सातारा जिल्हय़ात आठ विधानसभा 
मतदारसंघ असून अनेकांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सेनेतून भाजपामध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये खटावचे माजी आमदार दिलीप येळगावकर, जावळीचे सदाशिव सपकाळ, रवींद्र परामणो यांचाही समावेश आहे.
 
इच्छुकांचा अभाव
 क:हाड दक्षिण, क:हाड उत्तर, पाटण, फलटण आणि माण याच पाच मतदारसंघांत सेनेकडे इच्छुक नाहीत.
 
अहमदनगर
युतीचे पाच आमदार
जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, शिर्डी, नगर शहर, पारनेर हे 7 मतदारसंघ सेनेच्या वाटय़ाला होते तर राहुरी, नेवासा, शेवगाव-पाथर्डी, श्रीगोंदा, कजर्त-जामखेड हे 5 मतदारसंघ भाजपाच्या वाटय़ाला होते. दोघांचे 5 आमदार आहेत.
 
पाचपुतेंची एन्ट्री
बबनराव पाचपुतेंच्या भाजपा प्रवेशाने एकाची भर पडली. केवळ नगर शहरात दोन्ही पक्ष उमेदवार देऊ शकतात.
 
पुणो
शिवसेना प्रभावी
भाजपाच्या वाटय़ाला कसबा, शिवाजीनगर, पर्वती, पिंपरी, मावळ, दौंड, शिरूर, खडकवासला हे 8, तर शिवसेनेकडे वडगाव शेरी, कोथरूड, पुणो कॅन्टोंमेंट, हडपसर, खेड, आंबेगाव, जुन्नर, भोर-वेल्हा-मुळशी, पुरंदर, बारामती, इंदापूर, चिंचवड, भोसरी हे 13 मतदारसंघ आहेत. 
 
भाजपाचे मनसुबे
अनेक मातब्बर भाजपामध्ये प्रवेशाच्या तयारीत आहेत. त्यांच्या माध्यमातून ताकद वाढविण्याचे मनसुबे आहेत.
 
कोल्हापूर
सेनेच्या वाटय़ाला आठ जागा
जिल्ह्यातील 1क् मतदारसंघांपैकी आठ शिवसेनेकडे, दोन भाजपाकडे आहेत. इचलकरंजीत भाजपाचा आमदार आहे. सेनेकडे कोल्हापूर शहर, करवीर, कागल, चंदगड, राधानगरी, शिरोळ, हातकणंगले आणि शाहूवाडी हे आठ मतदारसंघ आहेत.
 
स्वाभिमानीची मागणी
शिवेसेनेला चंदगड, राधानगरी आणि शिरोळमध्ये कधीही यश मिळाले नाही. या जागा स्वाभिमानीने मागितल्या आहेत.
 
शिवसेनेची वाटचाल
मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी 19 जून 1966 रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई येथे सेनेची स्थापना केली. भूमिपुत्रंना न्याय देण्यासाठी मराठी भाषेभोवती आंदोलने सुरू करणा:या संघटनेचे सुरुवातीच्या काळातील सूत्र 8क् टक्के समाजकारण व 2क्} राजकारण असे होते. काळाच्या ओघात समाजकारणातून राजकारणाकडे सरकले. 
 
जनसंघ ते भाजपा
दुहेरी निष्ठा वा दुहेरी सदस्यत्वाच्या मुद्दय़ावरून जनसंघीय नेते जनता पार्टीतून फुटून बाहेर पडले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी असलेली भारतीय जनता पार्टी (भाजपा) 6 एप्रिल 198क् रोजी स्थापना झाली. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी ऑक्टोबर 1951 मध्ये स्थापन केलेल्या भारतीय जनसंघाचे ते नवे राजकीय रूप ठरले. 
 
युतीमधील घटनाक्रम
1972
शिवसेनेच्या 
प्रमोद नवलकर 
व जनसंघाच्या जयवंतीबेन मेहता यांच्या विरोधात परस्परांनी उमेदवार न देण्याचा निर्णय
 
1984
भाजपाच्या कमळ चिन्हावर शिवसेनेचे वामनराव महाडिक व मनोहर जोशी हे दोन उमेदवार लोकसभा रिंगणात उतरले व पराभूत झाले.
 
1989
सोलापूर येथील जाहीर सभेत सेनेबरोबर भाजपाची युती जाहीर.
 
1989
लोकसभेत युतीमुळे शिवसेनेचे चार खासदार विजयी.
 
1990
शिवसेनेचे 52 तर भाजपाचे 42 आमदार होते.
 
1995
युतीची राज्यात 
सत्ता आली.
 
1996
लोकसभेत शिवसेनेचे 15 खासदार विजयी.
 
1997
मुंबई महापालिका निवडणुकीत सेना-भाजपा युतीला 169 पैकी 1क्8 जागांवर विजय.
 
1999
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे पुन्हा 15 खासदार विजयी व रालोआ सरकारमध्ये शिवसेनेचे तीन मंत्री.
 
2002
लोकसभेचे सभापतीपद शिवसेनेच्या मनोहर जोशी यांच्याकडे.
 
2003
महाबळेश्वर येथील शिबिरात उद्धव ठाकरे यांची सेना कार्याध्यक्षपदी निवड.
 
2005
नारायण राणो यांची शिवसेनेतून हकालपट्टी
 
2005
चिमूरच्या पोटनिवडणुकीत जागा भाजपाला सोडण्यावरून सेना-भाजपात खडाखडी
 
2006
राज ठाकरे यांची सेनेला सोडचिठ्ठी
 
2007
संघर्ष विकोपाला, लालकृष्ण अडवाणी व राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत समझोता
 
2009
मातोश्रीवर भाजपा नेत्यांचे फोन उचलले जात नसल्याची तक्रार व लालकृष्ण अडवाणी यांना बाळासाहेब ठाकरे विश्रंती घेत असल्याने भेट नाकारली
 
2014
लोकसभेत मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाला मोठे यश व भाजपाकडून विधानसभेच्या 135 जागांची मागणी शिवसेनेचा नकार. वाद विकोपाला. 
 

 

Web Title: Alliance: Whose strength is?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.