आॅरिकमध्ये भूखंड वाटप २८ नोव्हेंबरपासून

By Admin | Published: November 10, 2016 05:28 AM2016-11-10T05:28:12+5:302016-11-10T05:28:12+5:30

आॅरिकमध्ये (औरंगाबाद इंडस्ट्रीयल सिटी) भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, २८ नोव्हेंबरपासून पहिल्या टप्प्यातील १०० एकरमध्ये उद्योजकांसाठी भूखंड वाटपाची

Allotment of land in ARC, from November 28 | आॅरिकमध्ये भूखंड वाटप २८ नोव्हेंबरपासून

आॅरिकमध्ये भूखंड वाटप २८ नोव्हेंबरपासून

googlenewsNext

औरंगाबाद : आॅरिकमध्ये (औरंगाबाद इंडस्ट्रीयल सिटी) भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, २८ नोव्हेंबरपासून पहिल्या टप्प्यातील १०० एकरमध्ये उद्योजकांसाठी भूखंड वाटपाची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
यातील २० एकर जागा लघुउद्योगांसाठी आरक्षित
असेल. तर, १० एकरमध्ये इको-सिस्टम डेव्हलपमेंट करण्यासाठी गाळे बांधण्यात येतील. एकमेकांसाठी पूरक असे उद्योगक्षेत्र विकसित होण्यासाठी आॅरिक सिटीचा मोठा वाटा असेल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. शेंद्रा येथील ‘आॅरिक हॉल’ या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. या समारंभानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणाले, एकात्मिक औद्योगिक शहर म्हणून आॅरिक विकसित होईल. दोन टप्प्यांत हे काम होईल. पहिला टप्पा ९ स्क्वे.मीटरचा आहे. आॅक्टोबर २०१८पर्यंत शेंद्रा नोडचे काम पूर्ण होईल. बिडकीनमधील काम २०१७ मध्ये सुरू होईल. २०२० मध्ये पहिला टप्पा, २०२१ मध्ये दुसरा टप्पा, २०२२ मध्ये तिसरा टप्पा असे काम होईल.
भूमिपूजनप्रसंगी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे,
उद्योगमंत्री सुभाष देसाई, सहकारमंत्री सुभाष देशमुख, खा.चंद्रकांत खैरे, खा. रावसाहेब दानवे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी, आॅरिकचे व्यवस्थापकीय संचालक विक्रमकुमार यांच्यासह एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
आॅरिकमध्ये ७० हजार कोटींची गुंतवणूक टप्प्याटप्प्याने येईल. ३० लाखांपर्यंत रोजगार निर्मिती होईल. गुरुवारी केंद्रीय कॅबिनेट बैठक होत असून, डीएमआयसीसाठी ८ हजार कोटींच्या निधीबाबत निर्णय होणे अपेक्षित आहे. ३ हजार कोटींचा निर्णय मागेच झालेला आहे. ६०० कोटींचा निधी आॅरिकसाठी मिळालेला आहे. कॅबिनेटमध्ये महत्त्वाची घोषणा होणे अपेक्षित असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Allotment of land in ARC, from November 28

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.