उद्या जंतनाशक गोळ्यांचे वाटप

By admin | Published: February 9, 2017 05:13 AM2017-02-09T05:13:01+5:302017-02-09T05:13:01+5:30

कृमी दोषांवर मात करून कुपोषण आणि रक्तक्षयावर नियंत्रण आणण्याच्या उद्देशाने १० फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय जंतनाशक दिन म्हणून पाळण्यात येत आहे

Allotment of pesticide pills tomorrow | उद्या जंतनाशक गोळ्यांचे वाटप

उद्या जंतनाशक गोळ्यांचे वाटप

Next

पुणे : कृमी दोषांवर मात करून कुपोषण आणि रक्तक्षयावर नियंत्रण आणण्याच्या उद्देशाने १० फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय जंतनाशक दिन म्हणून पाळण्यात येत आहे. यानिमित्ताने राज्यातील १ ते १९ वयोगटातील मुला-मुलींना जंतनाशक गोळ्या देण्याची मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती कुटुंब कल्याण विभागाच्या अतिरिक्त संचालक अर्चना पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पाटील म्हणाल्या, ‘राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त शासकीय, अनुदानित शाळा, आश्रमशाळा, तसेच शालाबाह्य असलेल्या मुला-मुलींना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. या वेळी गैरहजर असलेली मुले, आजारी मुले यांना १५ फेब्रुवारी रोजी या गोळ्या देण्यात येतील. उस्मानाबाद, नांदेड, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात तसेच नांदेड महापालिका हद्दीमध्ये हत्तीरोग दुरीकरण मोहिमेअंतर्गत सार्वत्रिक औषधोपचार मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत तेथे नागरिकांना जंतनाशक औषधे देण्यात येत असल्याने हे जिल्हे वगळून उर्वरीत राज्यात ही मोहीम राबवण्यात येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Allotment of pesticide pills tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.