सीमाप्रश्नी ठराव नसेल तरच नाट्यसंमेलनाला परवानगी द्या
By Admin | Published: January 29, 2015 04:18 AM2015-01-29T04:18:53+5:302015-01-29T04:18:53+5:30
कन्नड संघटनांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी बेळगाव : सीमाप्रश्नाचा ठराव मांडण्यात येणार नसेल तरच अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला परवानगी द्यावी,
बेळगाव : कन्नड संघटनांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी बेळगाव : सीमाप्रश्नाचा ठराव मांडण्यात येणार नसेल तरच अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला परवानगी द्यावी, अशी मागणी कन्नड कार्यकर्त्यांनी बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. कन्नड संघटनेच्या नेत्यांनी यापूर्वीही एकदा अशा आशयाचे निवेदन दिले होते.
येथे ७ फेब्रुवारीपासून होणाऱ्या नाट्य संमेलनाच्या तयारीला प्रारंभ झाला आहे. यामुळे कन्नड संघटनांनी आपले अस्तित्व दाखविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. सीमाप्रश्नाचा ठराव मांडणार नसतील तर सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून संमेलनाला आर्थिक मदतही जिल्हा प्रशासन करेल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती कन्नड संघटनेचे अशोक चंदरगी यांनी दिली. (प्रतिनिधी)