आलोकनाथ यांच्या मुलावर गुन्हा दाखल
By Admin | Published: October 5, 2016 05:27 AM2016-10-05T05:27:54+5:302016-10-05T05:27:54+5:30
अभिनेते आलोक नाथ यांच्या यांचा मुलगा शिवांग याच्यावर ‘ड्रिंक अॅण्ड ड्राईव्ह’ प्रकरणी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मुंबई : अभिनेते आलोक नाथ यांच्या यांचा मुलगा शिवांग याच्यावर ‘ड्रिंक अॅण्ड ड्राईव्ह’ प्रकरणी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार सोमवारी रात्री घडला असून त्याची कार देखील हस्तगत करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
सोमवारी रात्री वांद्रे वाहतूक विभागाकडून ‘ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह’ अंतर्गत कारवाई झाली. त्याच्यावर मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करत त्याला २६०० रुपयांचा दंड अकारण्यात आल्याचे सांताक्रुझ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंतनू पवार यांनी सांगितले. शिवांगकडे चालक परवाना देखील नव्हता, त्यावरून त्याची पोलिसांशी बाचाबाची झाली, असेही पोलीस सुत्रांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)