आधीच दुष्काळ, त्यात वीज कनेक्शन कापले

By admin | Published: December 7, 2014 12:23 AM2014-12-07T00:23:36+5:302014-12-07T00:23:36+5:30

राज्यातील १९,०६९ गावांत दुष्काळी परिस्थिती आहे. सरकारकडून संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बिल थकीत असले तरी वीज पुरवठा खंडित होणार नाही, अशी ग्वाही दिली जात आहे.

Already drought, power connection in it cut off | आधीच दुष्काळ, त्यात वीज कनेक्शन कापले

आधीच दुष्काळ, त्यात वीज कनेक्शन कापले

Next

महावितरणची मोहीम : ४३३ शेतकऱ्यांना फटका
कमल शर्मा - नागपूर
राज्यातील १९,०६९ गावांत दुष्काळी परिस्थिती आहे. सरकारकडून संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बिल थकीत असले तरी वीज पुरवठा खंडित होणार नाही, अशी ग्वाही दिली जात आहे. परंतु आश्वासनानंतरही नागपूर जिल्ह्यातील शेतीचा वीज पुरवठा खंडित करण्याचा सपाटा महावितरण कंपनीने लावला आहे.
विभागातील सहा जिल्ह्यातील २०२९ गावांची पैसेवारी ५० पैशाहून कमी आहे. यात नागपूर जिल्ह्यातील ५२५ गावांचा समावेश आहे. वर्धा १०४९, चंद्रपूर ४४२ तर भंडारा जिल्ह्यातील ७ गावांचा यात समावेश आहे. दुष्काळग्रस्त गावांना सरकारकडून सुविधा उपलब्ध केल्या जातात. त्यानुसार चंद्रपूर, वर्धा व भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत आहे. दुसरीकडे महावितरणने मंगळवारपासून नागपूर जिल्ह्यात वसुलीसाठी ४३३ शेतीचा वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे ओलिताचा प्रश्न उभा ठाकला आहे. जिल्ह्यात ७६,००० कृषिपंप जोडण्या असून, ८७ कोटींची थकबाकी आहे. यातील १२ एप्रिल ते १४ जूनदरम्यान ५३ कोटींची वसुली करण्यात आली. शासन निर्देशानंतरही वसुलीची मोहीम सुरू असून, थकबाकी न भरणाऱ्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित केला जात आहे. विभागातील सर्वच जिल्ह्यातील कृषिपंपांच्या वीज बिलाची थकबाकी आहे. यात चंद्रपूर ११.५४ कोटी, गडचिरोली ८.५१, वर्धा ५०. ५२, गोंदिया ६.९३ व भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे २०.७१ कोटींची थकबाकी आहे.
महावितरणचा वसुलीवर जोर
मागील थकबाकी वसुलीसाठी नव्हे तर चालू बिल भरण्याचा आग्रह क रीत आहोत. ज्या गावातील पैसेवारी कमी आहे अशा गावात वसुलीची कार्यवाही नाही. शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना राबविण्यात आली. ३० आॅक्टोबरला या योजनेची मुदत संपली. यात व्याजासोबतच मूळ बिलाच्या रकमेत सवलत देण्यात आली होती. परंतु शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला नाही, असे स्पष्टीकरण महावितरणने दिले आहे.
केंद्रीय पथक येणार
दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक १४ ते १७ डिसेंबरदरम्यान राज्याच्या दौऱ्यावर येत आहे. १४ व १५ रोजी मराठवाडा आणि १६ व १७ डिसेंबरला विदर्भातील दुष्काळग्रस्त गावांची पाहणी करणार आहेत. १७ डिसेंंबरला पथक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच चर्चा करणार आहे.

Web Title: Already drought, power connection in it cut off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.