पोलीस भरतीसाठी वकील, इंजिनिअर्स, शिक्षकांचेही अर्ज; ५४ पदांसाठी अडीच हजार अर्ज

By Appasaheb.patil | Published: December 13, 2022 12:47 PM2022-12-13T12:47:55+5:302022-12-13T12:48:07+5:30

सोलापूर ग्रामीण पोलिस दलात पोलिस शिपाई अन् चालकाची होणार भरती

Also applications of lawyers, engineers, teachers for police recruitment; 2500 applications for 54 posts | पोलीस भरतीसाठी वकील, इंजिनिअर्स, शिक्षकांचेही अर्ज; ५४ पदांसाठी अडीच हजार अर्ज

पोलीस भरतीसाठी वकील, इंजिनिअर्स, शिक्षकांचेही अर्ज; ५४ पदांसाठी अडीच हजार अर्ज

googlenewsNext

सोलापूर : सध्या सोलापूर ग्रामीण पोलिस दलात सुरू असलेल्या पोलिस शिपाई व पोलिस शिपाई चालक भरतीच्या निमित्ताने सुशिक्षितांच्या बेरोजगारीची दाहकता उघडकीस आली आहे. अवघ्या ५४ पदांसाठी अडीच हजार तरुण-तरुणी मैदानात उतरले आहेत. त्यात इंजिनिअर्स, शिक्षक अन् वकिलांसोबतच उच्च शिक्षण घेतलेल्यांचा समावेश आहे. दरम्यान, इतर शासकीय खात्यातील नोकरीपेक्षा पोलिस खात्यात आपली सेवा बजाविण्याकडे तरुणांचा कल वाढत असल्याचे सांगण्यात आले. अर्ज भरण्यासाठी फक्त दोनच दिवस उरले आहेत. 

दरम्यान, पोलिस खात्यामध्ये पोलिस शिपाई संवर्गामध्ये पोलिस शिपाई, पोलिस शिपाई चालक आणि सशस्त्र पोलिस शिपाई भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. अर्ज करणे, लेखी परीक्षा व मैदानी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. राज्याच्या पोलिस दलात रिक्तपदे वाढली असून, सततचा बंदोबस्त आणि वाढलेल्या गुन्हेगारी खटल्यांचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या पार्श्वभूमीवर आता रिक्तपदांची दोन टप्प्यांत भरती करण्याचे शासनाने जाहीर केले. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

१५ डिसेंबरपर्यंत करा अर्ज...
अर्ज सादर करताना येत असलेल्या अडचणी, विविध प्रमाणपत्र व भूकंपग्रस्त उमेदवारांना अर्ज करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्ज करण्यासाठी मुदतवाढीची घोषणा केली. १५ डिसेंबर २०२२ पर्यंत पोलिस भरतीसाठी अर्ज स्वीकारण्यात येणार आहे.

पोलिस अधीक्षक शिरीषकुमार सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. अर्ज दाखल करण्यासाठी १५ डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्यांनी अर्ज केले नाहीत त्या उमेदवारांनी अर्ज करावेत. पोलिस खात्यात येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. - अमोल भारती, उपविभागीय पोलिस अधिकारी, सोलापूर ग्रामीण

Web Title: Also applications of lawyers, engineers, teachers for police recruitment; 2500 applications for 54 posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस