निधी असतानाही समुद्रकिनारी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जीव सुरक्षा रक्षक नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 03:59 AM2017-08-03T03:59:42+5:302017-08-03T03:59:52+5:30
तालुक्यातील वसई सुुरुची बाग, अर्नाळा आणि कळंब-राजोडी समुद्रकिनारी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने तब्बल एक वर्षापूर्वी दिलेले ९ लाख ४३ हजार ५५० रुपये जिल्हाधिकारी कार्यालयात पडून आहेत.
वसई : तालुक्यातील वसई सुुरुची बाग, अर्नाळा आणि कळंब-राजोडी समुद्रकिनारी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने तब्बल एक वर्षापूर्वी दिलेले ९ लाख ४३ हजार ५५० रुपये जिल्हाधिकारी कार्यालयात पडून आहेत. पण, निधी मिळनूही सुरक्षेचे कोणतेच उपाय केले गेले नसल्याची बाब उजेडात आली आहे.
राज्य सरकारने समुद्रकिनाºयावर फिरायला येणाºया पर्यटक व स्थानिक लोकांच्या सुरक्षेसंबंधी उपाययोजना म्हणून संबंधित समुद्र किनाºयांवर प्रत्येकी दोन जीव सुरक्षा रक्षक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्हयातील ३४ किनाºयांची निवड करण्यात आली.
वसईतील समुद्रकिनाºयावर दरवर्षी पर्यटक बुडून मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडत आहेत. म्हणूनच सुरुची बाग, अ़र्नाळा आणि कळंब-राजोडी समुद्रकिनारी जीव सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार आनंद ठाकूर आणि वसई-विरार जिल्हाध्यक्ष गोविंदा गुंजाळकर यांनी राज्य सरकारकडे केली. ग्रामविकास मंत्र्यांनी ही मागणी मान्य करून २२ जुलै २०१६ रोजी पालघर जिल्हाधिकाºयांकडे निधीही वर्ग केला होता. ताबडतोब मिळूनही जिल्हाधिकारी कार्यालयातून वसईच्या तीन समुद्रकिनारी सुरक्षेसाठी उपाययोजना झालेल्या नाहीत.