वेतन दिले तरी ४० कोटी अडविले

By admin | Published: July 14, 2017 03:34 AM2017-07-14T03:34:39+5:302017-07-14T03:34:39+5:30

तारापूर अणुऊर्जाकेंद्र एक ते चारच्या व्यवस्थापनाने केलेल्या विनंती नुसार कंत्राटदारानी कंत्राटी कामगरांना किमान वेतनानुसार पगार दिला

Although the wages paid 40 crores | वेतन दिले तरी ४० कोटी अडविले

वेतन दिले तरी ४० कोटी अडविले

Next

पंकज राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बोईसर : तारापूर अणुऊर्जाकेंद्र एक ते चारच्या व्यवस्थापनाने केलेल्या विनंती नुसार कंत्राटदारानी कंत्राटी कामगरांना किमान वेतनानुसार पगार दिला. मात्र त्यासाठी एनपीआयसीएल ने रोखून ठेवलेले ४० कोटींचे बिल तातडी न दिल्यास या कामगारांचे पुढील वेतन रोखण्याचा निर्णय तारापूर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ने घेतला आहे.
तारापूर अणुऊर्जाकेंद्र एक ते चार व भाभा अणु संशोधन केंद्र (बीएआरसी) या दोन्ही प्रकल्पात व कर्मचारी वसाहतीमध्ये २०१४ सालापासून सुमारे अडीच ते तीन हजार पुरुष व महिला कंत्राटी कामगार काम करीत होते.
या कामगारांच्या किमान वेतनात १५० रुपयाने वाढ करण्यात आली आहे. त्याबाबतचे गॅझेट उशिरा प्राप्त झाले. त्यामुळे ते तत्काळ देता आले नाही. १० सप्टेंबर २०१४ रोजी तारापूर अणुऊर्जाकेंद्र एक ते चारच्या व्यवस्थापनाने (एन पी सी आय एल) नोटीस काढून कामगारांना सहा महिन्याच्या काळातील अतिरिक्त वाढीव रक्कम देण्याचे कंत्राटदारांना आदेश दिले.
या नुसार कंत्राटी कामगारांना वाढीव रक्कम देण्यात ही आली मात्र कंत्राटदारांच्या अकाउंटमध्ये त्या रक्कमेची नोंद ‘अ‍ॅडव्हान्स’ म्हणून करण्यात आली ही रक्कम दिवसेंदिवस वाढत गेल्याने ती देण्यास कंत्राटदारांनी असमर्थता दखविल्यानंतर काहींचे कॉन्ट्रॅक्टच बंद करण्यात आले तर अनेकांचे कामगार कमी केले.
एनपीसीआयएल व्यवस्थापन अतिरिक्त रक्कम बाबत योग्य निर्णय घेत नसल्याने तारापूर अणुऊर्जा केंद्रातील कंत्राटदार एकत्र येवून तारापूर काँटॅ्रक्टर असोसिएशनची स्थापना करून मुंबई सायन येथील केंद्रीय श्रम विभागाच्या असिस्टंट लेबर कमिशनर यांचे दरवाजे ठोठवाले त्यांनीही वाढीव रक्कम देण्याची जबाबदारी ही प्रिन्सीपलची असल्याचे मत व्यक्त केले आहे. ही ४० कोटींची बिले तातडीने दिली नाही व किमान वेतनाची फरकाची रक्कम दिली नाही तर कंत्राटींचे पुढील वेतन रोखण्याचा इशारा असोसिएशने दिला आहे.
कंत्राटदार म्हणतात ...तर आत्महत्या करावी लागेल !
मात्र त्या नंतरही कंत्राटी कामगारांच्या किमान वेतनामध्ये झालेल्या वृद्धीच्या पोटी अतिरिक्त रक्कम देण्याबाबत तारापूर अणुऊर्जा केंद्र व्यवस्थापनााने ठोस निर्णय घेतला तर नाहीच उलट शंभर ठेकेदारांच्या साडेचारशे बिलांच्या सुमारे ४० कोटीची बिल रोखून ठेवली आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांवर आली तशी आत्महत्या करण्याची पाळी आमच्यावर येईल असे कंत्राटदारानी सांगून कंत्राटी कामगारांना बोनसची रक्कम दिल्याचे व अन्य तांत्रिक मुद्दे उपस्थित करून अ‍ॅडव्हान्सची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप एनपीसीआयएलवर केला आह.

Web Title: Although the wages paid 40 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.