उड्डाणपुलाखाली बेकायदा टपऱ्या कायमच

By admin | Published: June 5, 2017 03:06 AM2017-06-05T03:06:27+5:302017-06-05T03:06:27+5:30

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तलासरी येथे असलेल्या उड्डाणपुलाखाली बेकायदा टपऱ्या मुळे उड्डाण पुलालाच धोका निर्माण झाला

Always underground flyer under illegal occupation | उड्डाणपुलाखाली बेकायदा टपऱ्या कायमच

उड्डाणपुलाखाली बेकायदा टपऱ्या कायमच

Next

सुरेश काटे।
लोकमत न्यूज नेटवर्क
तलासरी : मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तलासरी येथे असलेल्या उड्डाणपुलाखाली बेकायदा टपऱ्या मुळे उड्डाण पुलालाच धोका निर्माण झाला असून अपघातांचीही शक्यता वाढली आहे.
तलासरीच्या आमसभेत या टपऱ्यांवर चर्चा होऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले होते. तलासरी उड्डाण पुला खालच्या टपऱ्या काढण्या बाबत चार वर्षा पूर्वी खासदार चिंतामण वनगा यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता परंतु टपऱ्या न काढताच त्या काढल्याचा खोटा अहवाल अधिकाऱ्यांनी सादर करून टपऱ्या ना अभय दिले होते.
डहाणू विधानसभा मतदारसंघाचे आमदार पास्कल धनारे यांनी या टपऱ्या काढण्या बाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता तत्कालीन जिल्हाधिकारी बांगर यांनी एन.एच. ए. चे अधिकारी अगरवाल यांना टपऱ्या काढण्याचे आदेश दिले पण गेले वर्षभर त्यांनी या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. तहसीलदारांनीही या टपऱ्या नॅशनल हायवेच्या अखत्यारीत येत असल्याने त्या काढण्या बाबत त्यांना पत्र दिले तरी सुद्धा टपऱ्या कायम आहेत.
तलासरी उड्डाण पुलाखाली असलेल्या टपऱ्यांमध्ये अवैध धंदे चालत आहेत दारू पासून गुटक्या पर्यंत सगळे सर्रास मिळते , तसेच चायनीजच्या गाड्या वर घरगुती सिलेंडरचा वापर, अश्लील चित्रिफती मोबाईल मध्ये भरून देणारी दुकाने, या मोबाईलच्या टपऱ्या व तेथे उभी राहणारी टपोरी तरु णांची टोळकी व त्यांच्याकडून पुला खाली बसची वाट बघत असणाऱ्या आदिवासी तरुणी , महिला, व विद्यार्थिनीची होणारी छेडछाड यामुळे या टपऱ्या हटविण्याची मागणी नागरिकांनी केली असून आमदार व खासदारांनीही पत्र व्यवहार केला आहे तरीही टपऱ्या अ‍ॅथॉरिटीच्या आशिर्वादामुळे कायम आहेत.
येत्या दोन दिवसात टपऱ्या काढण्याची कारवाई न केल्यास अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल.
-आमदार पास्कल धनारे
टपऱ्या मुळे पुला खाली वाहतूक कोंडी होऊन अपघात होत आहेत कायदा सुव्यवस्था बिघडत असल्याने टपऱ्या काढण्याची कारवाई करावी असे पत्र एन एच ए ला दिले आहे.
- बी.के.नाईक, पोलीस निरीक्षक
टपऱ्या नॅशनल हायवेच्या अखत्यारीत येत असल्याने त्या काढण्याची कारवाई करण्याचे पत्र त्यांना दिले आहे.
- विशाल दौंडकर, तहसीलदार
टपऱ्या काढण्याची कारवाई तात्काळ करतो.
-दिनेश अगरवाल,
अभियंता एन एच ए,
- शशी भूषण, पी.डी. एन एच ए

Web Title: Always underground flyer under illegal occupation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.