‘आएम’चा हात नाही; मोक्का न्यायालय

By admin | Published: October 8, 2015 03:38 AM2015-10-08T03:38:00+5:302015-10-08T03:38:00+5:30

११ जुलै २००६ च्या साखळी स्फोटात सिमीच्या कार्यकर्त्यांच्या हात नसून इंडियन मुजाहिद्दीनच्या कार्यकर्त्यांचा सहभाग आहे, हे बचावपक्ष सिद्ध करू शकला नाही. मात्र विशेष सरकारी वकील आरोपींवरील

'AM' does not work; MCKA court | ‘आएम’चा हात नाही; मोक्का न्यायालय

‘आएम’चा हात नाही; मोक्का न्यायालय

Next

मुंबई : ११ जुलै २००६ च्या साखळी स्फोटात सिमीच्या कार्यकर्त्यांच्या हात नसून इंडियन मुजाहिद्दीनच्या कार्यकर्त्यांचा सहभाग आहे, हे बचावपक्ष सिद्ध करू शकला नाही. मात्र विशेष सरकारी वकील आरोपींवरील सर्व आरोप सिद्ध करू शकले आहेत, असे निरीक्षण नोंदवत विशेष मोक्का न्यायालयाने ७/११ खटल्यातील सर्व आरोपींना दोषी ठरवत फाशीची शिक्षा ठोठावली.
बचावपक्षाच्या वकिलांनी या बॉम्बस्फोटात इंडियन मुजाहिद्दीनच्या सदस्यांचा आहे, अशी बचावात्मक भूमिका घेतली. क्राईम ब्रँचने अटक केलेल्या आयमएचा सदस्य सादीक इसार याने रेझा आणि रियाझ भटकळ याच्या सांगण्यावरून पोलिसांना गुंगारा देण्यासाठी या स्फोटांची जबाबदारी घेतली, असे सादीक याने बचावपक्षाने साक्षीदार म्हणून न्यायालयात बोलावले असताना सांगितले. त्यामुळे बचावपक्षाने त्याला ‘फितूर’ म्हणून जाहीर करण्यास सांगितले. या बॉम्बस्फोटात आयएमच्या सदस्यांचा सहभाग आहे, हे सिद्ध करण्याची जबाबदारी बचावपक्षाची होती. मात्र ते त्यांची केस सिद्ध करू शकले नाहीत. त्यामुळे या बॉम्बस्फोटात आयएमचा सहभाग होता, असे म्हटले जाऊ शकत नाही.

Web Title: 'AM' does not work; MCKA court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.