दक्षिण भारत जैन सभेचे अंबडला नैमित्तिक अधिवेशन

By admin | Published: October 13, 2015 03:55 AM2015-10-13T03:55:47+5:302015-10-13T03:55:47+5:30

दक्षिण भारत जैन सभेचे ९५ वे नैमित्तिक अधिवेशन जालना जिल्ह्यातील अंबड येथे १८ आॅक्टोबरला (रविवार) होणार आहे.

Ambadala Narmittik Session of South India Jain Sabha | दक्षिण भारत जैन सभेचे अंबडला नैमित्तिक अधिवेशन

दक्षिण भारत जैन सभेचे अंबडला नैमित्तिक अधिवेशन

Next

औरंगाबाद : दक्षिण भारत जैन सभेचे ९५ वे नैमित्तिक अधिवेशन जालना जिल्ह्यातील अंबड येथे १८ आॅक्टोबरला (रविवार) होणार आहे. वेगवेगळ्या सत्रांत दिवसभर चालणाऱ्या अधिवेशनात विविध मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती उपाध्यक्ष डी. ए. पाटील यांनी सोमवारी सुमनबाई काला मुलींच्या वसतिगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
दिवंगत अण्णासाहेब लठ्ठे यांनी ११६ वर्षांपूर्वी सुरू केलेली दक्षिण भारत जैन सभा विविधांगांनी कार्य करीत आता एक सामाजिक चळवळ बनली आहे. उद्घाटन सोहळ्याला प. पू. पीठाधीश रवींद्रकीर्तीजी महाराज (अध्यक्ष, श्री त्रिलोक शोध संस्थान, हस्तिनापूर), जळगावचे उद्योगपती भंवरलालजी जैन, दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष श्रावकरत्न रावसाहेब पाटील, निवृत्त न्यायाधीश कैलासचंद चांदीवाल, अ. भा. तीर्थरक्षा कमिटी अध्यक्ष प्रमोदकुमार कासलीवाल, पन्नालाल गोधा, मिलिंद यंबल आणि अंजली मेहता उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)
पुरस्कारप्राप्त मान्यवर
भंवरलाल हिरालाल जैन, जळगाव (डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण सेवा पुरस्कार), विलासकुमार सखाराम दुरुगकर, सोलापूर (बी. बी. पाटील समाजसेवा पुरस्कार), सदाभाऊ खोत, मरळनाथपूर, सांगली (पद्मभूषण क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवाडी समाजसेवा पुरस्कार), ‘लोकमत’चे संपादक चक्रधर दळवी, औरंगाबाद (प्रभातकार वा. रा. कोठारी आदर्श पत्रकारिता पुरस्कार), डॉ. राजेंद्र चिंतामणी जैन, नागपूर (आचार्य कुंदकुंद प्राकृत ग्रंथ संशोधन व लेखन पुरस्कार), प्रा. विकास नागावकर, सोलापूर (आचार्य विद्यानंद (मराठी) साहित्य पुरस्कार), डॉ. पार्श्वनाथ जी. केंपन्नावर, चिक्कोडी (आचार्य बाहुबली (कन्नड) साहित्य पुरस्कार), यज्ञकुमार केशवराव करेवार, परभणी (डॉ. डी. एस. बरगाले समाजसेवा पुरस्कार), अरिहंत नागरी सहकारी पतसंस्था, औरंगाबाद (श्री अरिहंत क्रेडिट सौहार्द सह. आदर्श संस्था पुरस्कार), रावसाहेब पाटील, दानोळी (वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे आदर्श युवा पुरस्कार), प्रा. सुधा नेमिचंद पाटणी, औरंगाबाद (प्रा. डी. ए. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार), डॉ. बाळासाहेब सी. साजणे, नांदेड (बाळ पाटील सोशल कल्चरल अवेरनेस अवॉर्ड), विजयमाला भरतकुमार चव्हाण, कोल्हापूर (स्व. सुलोचना सिद्धाप्पा चौगुले आदर्श उद्योजिका पुरस्कार), याशिवाय अ‍ॅड. एस. एस. पाटील, मधुकर वैद्य, डॉ. न. म. जैन, दिलीप राठी, तारांचद दत्तात्रय खले यांचाही विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

Web Title: Ambadala Narmittik Session of South India Jain Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.