आंबेडकर भवन आणि प्रिटिंग प्रेस प्रकरणी स्वतंत्र वकील देणार

By admin | Published: July 5, 2016 09:24 PM2016-07-05T21:24:18+5:302016-07-05T21:24:18+5:30

दादर येथील आंबेडकर भवन आणि प्रिटिंग प्रेस पाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपी विजय रणपिसे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला.

Ambedkar Bhawan and Pritenik Pradhan will be given independent counsel | आंबेडकर भवन आणि प्रिटिंग प्रेस प्रकरणी स्वतंत्र वकील देणार

आंबेडकर भवन आणि प्रिटिंग प्रेस प्रकरणी स्वतंत्र वकील देणार

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ : दादर येथील आंबेडकर भवन आणि प्रिटिंग प्रेस पाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपी विजय रणपिसे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. त्यावेळी याप्रकरणावर पोलीस आणि सरकारी वकिलांनी आरोपींविरोधात चुप्पी साधल्याचा आरोप बारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांनी केला आहे. त्यामुळे न्यायालयात ट्रस्टतर्फे स्वतंत्र वकील देणार असल्याचे त्यांनी ह्यलोकमतह्णला सांगितले.
आंबेडकर म्हणाले की, न्यायालयाने विचारणा केली असता पोलीस आणि सरकारी वकील मात्र मौनीबाबा बनले होते. त्यामुळे कोणाच्या तरी आदेशावरून दोन्ही यंत्रणा मौनीबाबा झाल्याचा संशय येत आहे. परिणामी सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशानुसार, सरकारी वकीलाने चुप्पी साधल्यास फिर्यादीला स्वच:चा स्वतंत्र वकील देता येतो. त्या आधारावर प्रिटिंग प्रेसच्यावतीने स्वतंत्र वकील देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

Web Title: Ambedkar Bhawan and Pritenik Pradhan will be given independent counsel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.