आंबेडकर स्मारकाचा खर्च ४५० कोटी
By admin | Published: September 23, 2015 02:07 AM2015-09-23T02:07:15+5:302015-09-23T02:07:15+5:30
इंदू मिलच्या जागेवरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी सुप्रसिद्ध आर्किटेक्ट शशी प्रभू यांनी तयार केलेला आराखडा मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्वीकारण्यात आला
मुंबई - इंदू मिलच्या जागेवरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी सुप्रसिद्ध आर्किटेक्ट शशी प्रभू यांनी तयार केलेला आराखडा मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्वीकारण्यात आला. या स्मारकासाठी ४५० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ४ आॅक्टोबरला स्मारकाचे भूमिपूजन होणार आहे.
या स्मारकाच्या पहिल्या टप्प्यातील बांधकामासाठी १२५ कोटी रुपयांच्या खर्चाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या स्मारकाचा आराखडा शशी प्रभू आणि एका फ्रेंच कंपनीने सादर केला होता. फ्रेंच कंपनीने स्मारकासाठीची किंमत नमूद केली नव्हती. प्रभू यांनी मात्र ४२५ कोटी रुपये खर्चाचा अंदाज दिला आहे. त्यांचा आराखडा सरकारने स्वीकारला. (विशेष प्रतिनिधी)
प्रवेशद्वार २४.७६, स्तूप ११०, वस्तुसंग्रहालय १७.५४, पार्किंग - ३३.६६, ग्रंथालय ९, सभागृह - १२, सध्याचे बांधकाम पाडण्याचा खर्च ४४, पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था २०, विद्युत व्यवस्था २५, संरक्षक भिंत १३, उद्यान २५. (आकडे कोटी रु.मध्ये)