आंबेडकर स्मारकाचा वाद चिघळणार!

By Admin | Published: January 20, 2017 02:34 AM2017-01-20T02:34:16+5:302017-01-20T02:34:16+5:30

ऐरोलीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन स्मारकाच्या रखडलेल्या कामामुळे आंबेडकरी जनतेमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला

Ambedkar memorial issue will get annoyed! | आंबेडकर स्मारकाचा वाद चिघळणार!

आंबेडकर स्मारकाचा वाद चिघळणार!

googlenewsNext


नवी मुंबई : ऐरोलीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन स्मारकाच्या रखडलेल्या कामामुळे आंबेडकरी जनतेमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे पदाधिकाऱ्यांनी याविषयी नाराजी व्यक्त केली. खुप संयम पाळला आता रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला असून आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी शुक्रवारी बैठक आयोजीत केली आहे.
ऐरोलीमध्ये आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष सिद्राम ओहळ यांच्या निवासस्थानी नवी मुंबईमधील पदाधिकाऱ्यांनी रामदास आठवले यांची भेट घेतली. नवी मुंबईमध्ये धार्मीक स्थळांवर सुरू असलेल्या कारवाईची माहीती यावेळी आठवले यांना देण्यात आली. अडथळा होत नसलेल्या बुद्धविहारांवरही कारवाई केली जात आहे. महापालिकेने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आंबेडकर स्मारकाचे काम सुरू केले आहे. पण जवळपास ८ महिन्यांपासून बांधकाम ठप्प आहे. पालीका सभागृहाने डोमला मार्बल अच्छादन लावण्याचा ठराव मंजूर केला होता. पण आयआयटीने दिलेला अहवाल व आर्थीक बचतीचे कारण देवून मार्बल न लावण्याचा निर्णय घेतला. नागरीकांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर व पालिकेत लक्षवेधीच्या माध्यमातून आवाज उठविल्यानंतरही मार्बल न लावण्यावर प्रशासन ठाम असून सर्व काम ठप्प असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. आठवले यांनीही बांधकाम रखडल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून चर्चा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे आंबेडकरी जनतेच्या अस्मीतेचा प्रश्न आहे. काम रखडले असेल तर तुम्ही काय करताय. लोकांना एकत्रीत करा व आवाज उठवा असे आवाहनही आठवले यांनी केले आहे.
आठवले यांना भेटण्यासाठी महापौर सुधाकर सोनावणे, महेश खरे, युवराज मोरे, परमेश्वर गायकवाड, विजय कांबळे, शिला बोधडे व २०० ते ३०० पदाधिकारी उपस्थित होते. आतापर्यंत आम्ही खुप संयम ठेवला. शासनाने मुंबईतील इंदू मिलमध्ये स्मारकाचे भुमीपुजन केले पण प्रत्यक्ष कामाला सुरवात झालेली नाही. नवी मुंबईमध्ये महापालिकेने स्मारक उभारण्यास सुरवात केली आहे. काम अंतिम टप्प्यात असताना डोमला मार्बल बसविण्यावरून त्याला आक्षेप घेण्यात आला व काम थांबविले आहे. यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.
>नवी मुंबईमधील धार्मीक स्थळांवरील कारवाई व रखडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाकडे रामदास आठवले यांचे लक्ष वेधण्यात आले. कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. निवेदन व विनंती करूनही स्मारकाचे काम पुर्ण होत नसल्याने आता रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल. आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बैठकीचे आयोजन केले असून त्यामध्ये याविषयी अंतीम निर्णय घेण्यात येईल.
- सिद्राम ओहोळजिल्हा अध्यक्ष आरपीआय

Web Title: Ambedkar memorial issue will get annoyed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.