अंबरनाथ: राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे गेली बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये; अमराठी ब्रँच मॅनेजरने...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 18:14 IST2025-04-02T17:50:50+5:302025-04-02T18:14:24+5:30

MNS Marathi vs Bank Of Maharashtra Row video: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्याला आदेश दिले होते.

Ambernath video: MNS workers create ruckus in Bank of Maharashtra after Raj Thackeray's order; non Marathi branch manager... | अंबरनाथ: राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे गेली बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये; अमराठी ब्रँच मॅनेजरने...

अंबरनाथ: राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे गेली बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये; अमराठी ब्रँच मॅनेजरने...

मुंबईत येऊन आमच्या आस्थापनांत सांगता मराठी बोलणार नाही, कानफटीतच बसणार. उद्यापासून कामाला लागा. महाराष्ट्रातील प्रत्येक बँकेत, आस्थापनेत मराठी वापरली जाते का नाही ते बघा, असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्याला दिले होते. यानंतर अंबरनाथमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र बँकेमध्ये गोंधळ घातला. अमराठी ब्रँच मॅनेजरने मराठी बोलण्यास नकार देताच मनसेच्या कार्यकर्त्यांचा पारा चढला होता. 

अंबरनाथच्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अमराठी ब्रँच मॅनेजरने मराठी बोलण्यास नकार देत उलट उत्तरं दिल्याने संतापलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातला आहे. मराठीत बोलता येत नसेल, तर तुमच्या राज्यात निघून जाण्याचा इशारा या ब्रँच मॅनेजरला देण्यात आला. 

रिझर्व बँकेच्या नवीन गाईडलाईन्स प्रमाणे बँकेचे व्यवहार मराठीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबतचे पत्र मनसेकडून सर्व बँकांना देण्यासाठी आज अंबरनाथमध्ये शहराध्यक्ष कुणाल भोईर, शहर संघटक स्वप्निल बागुल आणि विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव हे कार्यकर्त्यांसह गेले होते. यावेळी अंबरनाथच्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये शर्मा नामक अमराठी ब्रँच मॅनेजरने मराठी येत नसल्याचे सांगितले. यावर मनसेने मराठी येत नसल्यास तुमच्या राज्यात जाऊन काम करा, असा इशारा त्यांना दिला. त्यावर या ब्रँच मॅनेजरने हे आमच्या पुण्याच्या मुख्य शाखेला जाऊन सांगा, असे उत्तर दिल्याने संतापलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांनी ब्रँच मॅनेजरच्या केबिनमध्ये गोंधळ घातला. तसंच बँकेचे व्यवहार मराठीत न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला. 

मॅनेजर काय म्हणाला...
आम्ही पब्लिक सर्व्हंट आहोत, देशात कुठेही जाऊन काम करू शकतो. कोणतीही भाषा शिकायला वेळ लागतो. उद्या तामिळनाडूत गेलो तर तामिळ शिकायला लागेल, असे म्हटले. या मॅनेजरला अंबरनाथला दीड वर्ष झाले आहे. मनसेने दीड वर्षे झाली तर आणखी किती वेळ लागणार मराठी शिकायला असा सवाल केला. 

Web Title: Ambernath video: MNS workers create ruckus in Bank of Maharashtra after Raj Thackeray's order; non Marathi branch manager...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.