कर न भरल्याने 'अॅम्बी व्हॅली' सील

By admin | Published: March 1, 2016 01:32 PM2016-03-01T13:32:23+5:302016-03-01T13:57:41+5:30

सहारा इंडिया परिवारच्या अॅम्बी व्हॅली टाऊनशिपवर कारवाई करत मुळशीच्या तहसीलदारांनी अॅम्बी व्हॅलीला सील ठोकलं आहे

'Ambi Valley' seal due to non-taxation | कर न भरल्याने 'अॅम्बी व्हॅली' सील

कर न भरल्याने 'अॅम्बी व्हॅली' सील

Next
>
ऑनलाइन लोकमत - 
पुणे, दि. १ - सहारा इंडिया परिवारच्या अॅम्बी व्हॅली टाऊनशिपवर कारवाई करण्यात आली आहे. मुळशीच्या तहसीलदारांनी ही कारवाई केली असून अॅम्बी व्हॅलीला सील ठोकण्यात आले आहे. मिळालेल्या माहितनुसार ४ कोटी ८२ लाखांचा कर न भरल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांच्या कडेकोट बंदोबसत्तात ही कारवाई करणायत आली. या कारवाईमुळे सहारा समूहच्या अडचणीत वाढ झाली आहे. महत्वाचं म्हणजे मार्च २०१५मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सुब्रतो रॉय सहारा यांच्या सुटकेसाठी 'अ‍ॅम्बी व्हॅली'  विक्री करून पैसे उभारा आणि ही मालमत्ता विक्रीची प्रक्रिया तीन महिन्यांत पूर्ण करा असे आदेशदेखील दिले होते.
लोणावळ्याजवळचे आलिशान निवासी संकुल म्हणून 'अ‍ॅम्बी व्हॅली' ची ओळख आहे. राज्यात शिवसेना-भाजप युतीची सत्ता असताना 1995 मध्ये या'अ‍ॅम्बी व्हॅली' चे उद्‌घाटन करण्यात आले होते. त्यावेळचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी अ‍ॅम्बी व्हॅलीला सरकारकडून सर्व प्रकारच्या मान्यतादेखील दिल्या होत्या. 
 

Web Title: 'Ambi Valley' seal due to non-taxation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.