रुग्णवाहिकांचे आरोग्यच संशयाच्या भोव:यात
By admin | Published: August 7, 2014 11:25 PM2014-08-07T23:25:00+5:302014-08-07T23:25:00+5:30
जीवन - मरणाच्या दारात झुंज देणा:या रुग्णासाठी रुग्णवाहिका ही जीवन वाहिनीसारखी असते. मात्र, शहरातील सुमारे 4क् टक्के रुग्णवाहिका ‘आरोग्य’ बिघडलेल्या अवस्थेत आहे.
Next
>पुणो : जीवन - मरणाच्या दारात झुंज देणा:या रुग्णासाठी रुग्णवाहिका ही जीवन वाहिनीसारखी असते. मात्र, शहरातील सुमारे 4क् टक्के रुग्णवाहिका ‘आरोग्य’ बिघडलेल्या अवस्थेत आहे. वैद्यकीय उपकरणो व त्यासंदर्भातील सुविधांची तपासणी दूरच; मात्र 1351 पैकी 561 रुग्णवाहिकांचे ‘आरटीओ’कडून नियमित ‘चेकअप’ केलेले नाही.
रुग्णवाहिकांचे दोन प्रकार असतात. सर्वसामान्य प्रकारात रुग्णवाहिकेमध्ये पायाभूत उपचारांच्या सुविधा असतात. दुस:या प्रकारात अद्ययावत वैद्यकीय यंत्रणा असते. शहरामध्ये पायाभूत सुविधा असलेल्या रुग्णवाहिकांची संख्या जास्त आहे. त्यामध्येही सर्वसाधारण यंत्रणा व उपकरणो आवश्यक असतात. मात्र, यामध्येही खासगी प्रकारात मोडणा:या रुग्णवाहिकांवर कोणाचेही नियंत्रण नाही. 561 रुग्णवाहिकांची जर नियमित तपासणी होत नसेल, तर अन्य सर्वसाधारण गाडय़ांची स्थिती अधिकच दुर्दैवी असणार आहे.
शहरात 1351 पैकी 561 रुग्णवाहिका अनफिट असून, 2क्12 नंतर त्यांची एकदाही नियमित तपासणी झालेली नाही. या गाडय़ांची मेकॅनिकल तपासणीची जबाबदारी ‘आरटीओ’ची आहे. आरटीओ जितेंद्र पाटील यांनी सांगितले, शासकीय, खासगी रुग्णालय, नर्सिग होम, स्वयंसेवी संस्था यांच्याकडील 1351 रुग्णवाहिकांची नोंद आहे. त्यापैकी 79क् गाडय़ांची नियमित तपासणी होत आहे. नव्या रुग्णवाहिकांची दोन वर्षानंतर आणि जुन्या रुग्णवाहिकांची दर वर्षी तपासणी आवश्यक आहे. नियमानुसार, कोणत्याही वाहनाने फिटनेस तपासणी केली नाही, तर ते अनफिट व बेकायदेशीर वाहन म्हणून घोषित केले जाते. (प्रतिनिधी)
अशी होते तपासणी
‘आरटीओ’कडून रुग्णवाहिकेच्या सर्व पार्टची तपासणी होते. सुरक्षेशी संबंधित सर्व प्रमाणांवर ही गाडी योग्य असेल, तरच तिला फिटनेस प्रमाणपत्र दिले जाते. त्यामध्ये सर्व तांत्रिक गोष्टींबरोबरच ब्रेक, क्लच, लाईट, टायर यांची स्थिती तपासली जाते. दर वर्षी होणा:या या तपासणीला तीनशे रुपये खर्च येतो.
रुग्णवाहिकेमधील सुविधा
अॅम्ब्युलन्स दोन प्रकारच्या असतात. बेसिक लाइफ सपोर्ट आणि अॅडव्हान्स्ड लाइफ सपोर्ट. पहिल्या प्रकारात विशेष सुविधा नसतात. त्यांचा उपयोग रुग्णाची ने-आण करण्यासाठी होतो. दुस:या प्रकारात गाडय़ांमध्ये सिलिंडर, स्ट्रेचर, ईसीजी मशिन, सिरींज पंप, डेफिब्रिलेटर (हृदय यंत्रणा), बीपी मशिन, व्हेंटिलेटर, सक्शन मशिन, नेब्युलायझर, मास्क, फस्र्ट एड किट, नर्स, डॉक्टर आणि टेक्निशियन यांचा समावेश असतो.
- डॉ. डी. डी. कुलकर्णी, वैद्यकीय पर्यवेक्षक, ससून रुग्णालय.
अॅम्ब्युलन्सची तपासणी आमच्या कार्यकक्षेत नाही.
खासगी अॅम्ब्युलन्सची नियमित तपासणी होण्याची गरज आहे. मात्र, ही तपासणी आमच्या अधिकारक्षेत्रत येत नाही. खासगी अॅम्ब्युलन्सनी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे तपासणी करावी, असा कोणताही नियम नाही.
- डॉ. एस. टी. परदेशी, आरोग्य विभागप्रमुख, महापालिका.
रुग्णवाहिका बनली धंदा
4रुग्णाला रुग्णालयात पोहोचविणो आणि त्या दरम्यान त्याच्यावर उपचार सुरू ठेवण्यामध्ये रुग्णवाहिक ा महत्त्वाची भूमिका बजावतात.
4रुग्णवाहिका ही अत्यावश्यक सेवा आहे. मात्र, नियंत्रणाअभावी हा व्यवसाय होत आहे. अनेक राजकीय आणि सामाजिक संस्थांकडून मोठय़ा रकमा घेऊन रुग्णवाहिका सुरू करण्यात येतात. मात्र, या गाडय़ा व्यवसायाचे साधन बनतात. त्यातून मनमानी पद्धतीने लूट करून, रुग्ण आणि नातेवाइकांची अडवणूक केली जाते. अनेक रुग्णवाहिकांमध्ये वैद्यकीय सेवासुविधा उपलब्ध नसतात.