बाजारपेठेत अमेरिकन फळे

By admin | Published: April 17, 2017 02:40 AM2017-04-17T02:40:24+5:302017-04-17T02:40:24+5:30

उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेले नागरिक फळांचा आधार घेत असून देश- परदेशातील फळांची बाजारपेठेत रेलचेल वाढली आहे़ अमेरिका

American fruit in the market | बाजारपेठेत अमेरिकन फळे

बाजारपेठेत अमेरिकन फळे

Next

नांदेड : उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेले नागरिक फळांचा आधार घेत असून देश- परदेशातील फळांची बाजारपेठेत रेलचेल वाढली आहे़ अमेरिका, आॅस्ट्रेलिया, चीन, थायलंड येथील वेगवेगळ्या फळांसोबतच या हंगामातील द्राक्ष, टरबूज, खरबूज, आंबे दुकानावर दिसत आहेत़
सध्या बाजारपेठेत हापूस आंबा बाजारपेठेत दाखल झाला आहे़ टरबूज, खरबूज, चिकू, पपई, डाळींब, काकडी या फळांचीही मागणी वाढली आहे़ भारतीय फळांच्या सोबतीने विदेशातील वेगवेगळ्या फळांनीही नांदेडकराकंचे लक्ष वेधले आहे़ यापूर्वी देशातील विविध प्रांतातून आलेल्या फळांचे अपूुप सर्वांनाच असे़ परंतु आता सातासमुद्रापलीकडून फळांची आयात मोठ्या प्रमाणात शहरात होत आहे़ मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर या महानगरानंतर आता नांदेड मध्येही देश- विदेशातील फळांची विक्री होत आहे़ विशेषत: अमेरिकन पेर्स, अमेरिकन आॅरेंज, अमेरिकन गोड चिंच, टीव्ही फ्रुट, अमेरिकन ग्रेप्स, अमेरिकन अ‍ॅपल या फळांनी नांदेडकरांच्या घरात जागा मिळविली आहे़
यासंदर्भात माहिती देताना वर्कशॉप येथील व्यापारी सय्यद चाँद म्हणाले, सध्या उन्हाळा असल्यामुळे फळांचा मोसम सुरू होत आहे़ या हंगामातील आंबे बाजारात आले आहेत़ यंदा हापूस आंबा लवकरच आला आहे़ येत्या पंधरा दिवसांत आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात होईल़ सोलापूर, बार्शी, पंढरपूर, लातूर या भागातून द्राक्ष, संत्री, डाळींब, मोसंबी, कोकण, केरळ भागातून नारळ, गुजरातहून चिकू, आंध्र प्रदेशातून टरबूज, खरबुजांची आयात करण्यात येते़ (प्रतिनिधी)

Web Title: American fruit in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.