अमित शाह संघनेत्यांना भेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2017 12:56 AM2017-03-11T00:56:21+5:302017-03-11T00:56:21+5:30

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज अचानक मुंबईत येऊन रा.स्व. संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांच्याशी बंदद्वार चर्चा केली.

Amit Shah met the Sangh leaders | अमित शाह संघनेत्यांना भेटले

अमित शाह संघनेत्यांना भेटले

Next

मुंबई : भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज अचानक मुंबईत येऊन रा.स्व. संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांच्याशी बंदद्वार चर्चा केली. संघाच्या वरळीतील यशवंत भवन कार्यालयात सुमारे तासभर ही चर्चा झाली.
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल उद्या जाहीर होणार असताना संभाव्य निकाल आणि भाजपाच्या रणनीतीबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेषत: उत्तर प्रदेशबाबत चर्चा झाल्याचे समजते.
सूत्रांनी सांगितले की, गोव्यामध्ये बहुमताला जागा कमी पडल्या तर भाजपाची काय रणनीती असेल याबाबत शाह यांनी जोशींना या बैठकीत माहिती दिली.
उत्तर प्रदेशात पक्षाला बहुमत मिळेल आणि कोणाशी आघाडी करण्याची गरज भासणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Amit Shah met the Sangh leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.