अमित शहा आज सोलापूर मुक्कामी; दिल्लीच्या सुरक्षा पथकाने घेतला शासकीय विश्रामगृहाचा ताबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 02:56 PM2019-09-01T14:56:54+5:302019-09-01T15:02:20+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा आज सोलापुरात समारोप
सोलापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौºयानिमित्त दिल्ली येथील सुरक्षा पथकाने शासकीय विश्रामगृह, पार्क स्टेडियमचा ताबा घेतला आहे. शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सर्वत्र कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.
महाजनादेश यात्रेनिमित्त अमित शहा हे रविवारी सोलापूरच्या दौºयावर येत आहेत. सायंकाळी ४.४0 वाजण्याच्या सुमारास अमित शहा यांचे विमानाने सोलापुरात आगमन होणार आहे. ४.४५ वाजता ते सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात येणार आहेत. जुना पुणे नाका येथे येणाºया महाजनादेश यात्रेसाठी जाणार आहेत. तेथून अमित शहा हे पार्क स्टेडियम येथे होणाºया कार्यक्रमाच्या ठिकाणी येणार आहेत.
शहर पोलीस आयुक्तालयाच्यावतीने कार्यक्रम स्थळाची जबाबदारी पोलीस उपायुक्त (गुन्हे) बापू बांगर तर शहरातील बंदोबस्त पोलीस उपायुक्त मधुकर गायकवाड यांच्याकडे आहे. १४ ते १५ पोलीस निरीक्षक, १६ सहायक पोलीस निरीक्षक, २२ फौजदार, पोलीस कर्मचारी, एसआरपीएफची तुकडी, क्युआरटी पथक आदींचा मोठा फौजफाटा लावण्यात आला आहे.
वाहतूक मार्गात बदल...
- रविवारी शहरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. सरस्वती चौक ते पार्क चौक, लकी चौक ते चार पुतळा, शुभराय आर्ट गॅलरी ते पार्क चौक, डफरीन चौक ते पार्क चौक, मार्केट चौकी ते पार्क चौक या मार्गावरील वाहतूक पूर्णत: बंद करण्यात आली आहे. लकी चौक, सरस्वती चौक ते डफरीन चौकातील वाहतूक रामलाल चौक, महापौर बंगला मार्गे सोडण्यात आली आहे. शुभराय आर्ट गॅलरी ते मार्केट चौकीची वाहतूक नवल पेट्रोलपंप, डफरीन चौक मार्गे सोडण्यात आली आहे. मार्केट चौकी ते पार्क चौकातील वाहतूक दत्त चौक किंवा हरिभाई देवकरण प्रशाला, डफरीन चौक मार्गे देण्यात आली आहे. सभेसाठी तुळजापूर रोड, पुणे रोड, मंगळवेढा रोडकडून सभेकरिता येणाºया वाहनांची पार्किंग व्यवस्था जुनी मिल कंपाउंड येथे करण्यात आली आहे.