पोट निवडणूक झाल्यास अमित शाह बडोद्यातून लढणार
By admin | Published: May 9, 2014 01:21 AM2014-05-09T01:21:02+5:302014-05-09T01:21:02+5:30
भाजपाचे उत्तर प्रदेशातील प्रभारी अमित शाह यांना बडोद्यातून उमेदवारी दिली जाईल. बडोद्यात नरेंद्र मोदी विक्रमी मतांनी विजयी होण्याची शक्यता असून ते ही जागा शाह यांच्यासाठी रिक्त करतील.
अहमदाबाद : भाजपाचे उत्तर प्रदेशातील प्रभारी अमित शाह यांना बडोद्यातून उमेदवारी दिली जाईल. बडोद्यात नरेंद्र मोदी विक्रमी मतांनी विजयी होण्याची शक्यता असून ते ही जागा शाह यांच्यासाठी रिक्त करतील. वाराणशीमध्ये मताधिक्य फार जास्त राहणार नसले तरी मोदींचा विजय निश्चित मानला जातो. शाह यांना गुजरातच्या मुख्यमंत्रिपदात अधिक स्वारस्य आहे मात्र हे पद आनंदीबेन पटेल यांच्याकडेच जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. उत्तर प्रदेशातील चांगल्या कामगिरीचा पुरस्कार म्हणून शाह यांना बडोद्याची जागा दिली जाईल, असे सूत्रांनी म्हटले. शाह यांच्याकडे गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्याइतपत ते परिपक्व मानले जात नसून त्यांना पंतप्रधान कार्यालयात जबाबदारी दिली जाणार असल्याची अंतर्गत गोटात चर्चा आहे. अहमदाबादमधील नरानपुरा हा शाह यांचा विधानसभा मतदारसंघ नरहरी अमीन यांच्याकडे दिला जाईल. अमीन यांनी २०१२च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला होता.