अमित शाह लिहिणार मराठ्यांचा इतिहास, भाजपाचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2017 06:48 PM2017-09-10T18:48:49+5:302017-09-11T10:32:22+5:30

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाहा हे छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास गुजराती भाषेमध्ये लिहिणार असल्याची माहिती भाजपाचे उपाध्यक्ष खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी दिली. भाजप अध्यक्ष अमित शहा लिखित आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी प्रकाशित ‘भारतीय जनता पार्टी राजकारण कशासाठी’ या पुस्तकाचे प्रकाशन आज बालगंधर्व रंग मंदिरात करण्यात आले.

Amit Shah writes about Maratha history, BJP MP Vinay Sahastrabuddhe | अमित शाह लिहिणार मराठ्यांचा इतिहास, भाजपाचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांची माहिती

अमित शाह लिहिणार मराठ्यांचा इतिहास, भाजपाचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांची माहिती

Next

पुणे, दि. 10 - भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाहा हे छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास गुजराती भाषेमध्ये लिहिणार असल्याची माहिती भाजपाचे उपाध्यक्ष खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी दिली. भाजप अध्यक्ष अमित शहा लिखित आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी प्रकाशित ‘भारतीय जनता पार्टी राजकारण कशासाठी’ या पुस्तकाचे प्रकाशन आज बालगंधर्व रंग मंदिरात करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना विनय सहस्त्रबुद्धे यांनी शहा यांच्या आगामी पुस्तकाबद्दल माहिती दिली.

आजवर गुजरातमध्ये शिवाजी महाराज यांनी सुरत लुटली इतकीच त्यांची ओळख असल्याचे चित्र रंगवण्यात आलं आहे. तसेच याबद्दल अनेक समज गैरसमज देखील पसरले आहेत . महाराजांचा खरा इतिहास गुजरातमधील जनतेसमोर यावा यासाठी शहा हे मराठ्यांच्या इतिहासाचा गेली सहा महिने अभ्यास करत आहेत. गुजरातेत शिवाजी महाराजांनी सुरत लुटल्याचे चित्र आहे, हे चित्र बदलण्यासाठी गुजराती भाषेत पुस्तक लिहिणार असल्याची माहिती सहस्त्रबुद्धे यांनी दिली. 

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीने भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी लिहिलेल्या "भाजपा राजकारणात कशासाठी" या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, खासदार विनय सहस्त्रबुद्धे उपस्थित होते.

Web Title: Amit Shah writes about Maratha history, BJP MP Vinay Sahastrabuddhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.