अमित शहांना नागपुरात काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न

By admin | Published: July 18, 2014 01:26 PM2014-07-18T13:26:49+5:302014-07-18T13:31:34+5:30

नागपुरात आलेल्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना युवक काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न केला

Amit Shah's attempt to show black flags in Nagpur | अमित शहांना नागपुरात काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न

अमित शहांना नागपुरात काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न

Next
>युवक काँग्रेसचे कार्यकर्ते ताब्यात  
नागपूर : नागपुरात आलेल्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना युवक काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी ताब्यात घेतले व झेंड्यांसह बॅनर जप्त केले, त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला
होता. 
शुक्रवारी सकाळी नागपुरात आगमन झाल्यानंतर विमानतळावर भाजप कार्यकर्त्यांनी शहा यांचे जंगी स्वागत केले. त्यानंतर शहा यांचा ताफा दीक्षाभूमीसाठी रवाना झाला. नागपुरातील वर्धा रोडवर राजीवनगर चौकात मंदिराजवळ ताफा आला असता युवक काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आधीच साध्या वेशात दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. 
युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष बंटी शेळके यांच्या नेतृत्त्वात चक्रधर भोयर, निलेश चंद्रिकापुरे, रेनॉल्ड जेराम, अंदाज वाघमारे, अमित पाठक, राकेश निकोसे, स्वप्नील ढोके, विशाल साखरे, निलेश पाटील, मोहम्मद उमर, चेतन थूल, स्वप्नील ढोके आदी कार्यकर्ते राजीव नगर चौकात जमले. त्यांनी सोबत आणलेले काळे झेंडे व शहा विरोधी घोषणा लिहिलेले बॅनर सोबत लपवून ठेवले होते.
दुपारी १२ च्या सुमारास शहा यांचा ताफा समोरून येताना दिसताच कार्यकर्त्यांनी झेंडे बाहेर काढले. मात्र, युवक काँग्रेसच्या हालचाली लक्षात येताच दबा धरून बसलेल्या ३0 ते ४0 पोलिसांनी त्यांना लगेच ताब्यात घेतले. सर्व झेंडे जप्त केले. काहींना पोलीस व्हॅनमध्ये बसवून मागच्या गल्लीत नेऊन सोडले. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना विरोध केल्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता.  
दरम्यान आज दुपारी शहा सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेणार आहेत.
(प्रतिनिधी) 

Web Title: Amit Shah's attempt to show black flags in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.