अमित ठाकरेंची कार अडवली; संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी समृद्धीवरील टोलनाका फोडला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2023 10:33 AM2023-07-23T10:33:52+5:302023-07-23T11:05:16+5:30

मागील ३ दिवसांपासून अमित ठाकरे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.

Amit Thackeray's car stopped; Enraged MNS workers broke the toll booth on Samriddhi Mahamarg | अमित ठाकरेंची कार अडवली; संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी समृद्धीवरील टोलनाका फोडला

अमित ठाकरेंची कार अडवली; संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी समृद्धीवरील टोलनाका फोडला

googlenewsNext

नाशिक – मनसे नेते आणि मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित राज ठाकरे सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात अमित ठाकरे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहे. यावेळी नाशिकला असताना सिन्नर जवळ समृद्धी महामार्गावर अमित ठाकरे यांची कार टोलनाका कर्मचाऱ्यांनी अडवली. त्यानंतर संतापलेल्या कार्यकर्त्यांनी टोलनाका फोडला आहे. अमित ठाकरे या महामार्गावरून गेल्यानंतर हा प्रकार घडला.

मागील ३ दिवसांपासून अमित ठाकरे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. नंदूरबार, धुळे, जळगाव याठिकाणी त्यांनी मेळावे घेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अमित ठाकरेंचा ताफा मुंबईच्या दिशेने जात होता. यावेळी सिन्नरजवळील समृद्धी महामार्गावरील टोलनाक्यावर अमित ठाकरेंची कार अडवण्यात आली. काही काळ अमित ठाकरेंना तिथे उभेदेखील राहावे लागले. फास्टटॅगच्या तांत्रिक बिघाडामुळे विलंब झाल्याची माहिती आहे. मात्र त्यानंतर अमित ठाकरे तिथून निघून गेले. पण मनसे नाशिक शहराध्यक्ष दिलीप दातार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रागाच्या भावनेतून या टोलनाक्याची तोडफोड केली.

२-३ वाहनांमधून मनसे कार्यकर्ते टोलनाक्याला दाखल झाले होते. त्यांनी टोलनाक्याच्या केबिनमधील काचा फोडल्या आणि त्याठिकाणाहून निघून गेले. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अद्याप या घटनेत कुणीही तक्रार केली नाही. परंतु पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.

मनसेने उभारले होते टोलनाक्यांविरोधात आंदोलन

काही वर्षापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील टोलनाक्यांविरोधात आंदोलन उभारले होते. अनेक टोलनाक्यांवर मनसे कार्यकर्त्यांनी स्वत: उभे राहून वाहनांची नोंदणी केली होती. मुदत संपूनही अनेक टोलनाके राज्यात सुरू असल्याचे निदर्शनास येताच राज ठाकरेंच्या आदेशाने कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यानंतर राज्य सरकारने ६५ टोलनाके बंद करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु राज ठाकरेंचे हे टोलनाका आंदोलन प्रचंड गाजले होते. त्यानंतर विरोधकांनी टोलनाक्याच्या माध्यमातून राज ठाकरेंनी सेटलमेंट केली असा आरोप केला. आता पुन्हा मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड सुरू केली. त्यात समृद्धी महामार्गावर टोलनाक्याची पहिल्यांदाच तोडफोड झाली आहे.

Web Title: Amit Thackeray's car stopped; Enraged MNS workers broke the toll booth on Samriddhi Mahamarg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.