अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवरुन शेअर केली जुनी आठवण
By admin | Published: February 22, 2016 11:44 AM2016-02-22T11:44:10+5:302016-02-22T11:44:10+5:30
अमिताभ बच्चन यांनी ट्विटरुन आपला एक जूना ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो शेअऱ केला आहे. हा फोटो त्यांनी आपल्या करिअरच्या सुरुवातीला एका टॅलेंट हंटसाठी पाठवला होता
Next
ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 22 - बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विटरुन आपला एक जूना ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो शेअऱ केला आहे. हा फोटो त्यांनी आपल्या करिअरच्या सुरुवातीला एका टॅलेंट हंटसाठी पाठवला होता. तुमचा विश्वास बसणार नाही मात्र त्यांना नाकारण्यात आलं होतं. खुद्ध अमिताभ बच्चन यांनीच या फोटोसोबत ही आठवण शेअर केली आहे.
अमिताभ बच्चन यांनी हा फोटो ट्विट करताना सांगितल आहे की, 'हा फोटो मी फिल्मफेअर माधुरी स्पर्धेसाठी पाठवला होता...त्यांनी मला नाकारल होतं यात काही आश्चर्य वाटण्यासारखं आहे का'. अमिताभ बच्चन यांना चित्रपटात काम करायचं होतं आणि त्यासाठीच त्यांनी या स्पर्धेसाठी हा फोटो पाठवला होता.
अमिताभ बच्चन यांनी 1969मध्ये सात हिंदुस्तानी चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदापर्ण केलं. काही दिवसांपुर्वी ब्लॉगवरदेखील यासंबंधी आपल्या आठवणी त्यांनी ताज्या केल्या होत्या. ब्लॉग लिहिताना अमिताभ बच्चन यांनी '15 फेब्रुवारी 1969ला ख्वाजा अहमद अब्बास यांच्याकडे सात हिंदुस्तानी चित्रपटासाठी मी ऑडिशनसाठी गेलो होतो. तो माझा पहिला चित्रपट होता. 47 वर्ष पुर्ण झाली' अशी आठवण शेअर केली होती.
T 2152 - This the picture I sent to FilmfareMadhuri Contest to join films .. is it any wonder they rejected me !! pic.twitter.com/49ECTENzrk
— Amitabh Bachchan (@SrBachchan) February 21, 2016