लेटरबॉम्बमध्ये अमोनियम नायटे्रट

By admin | Published: May 11, 2016 01:17 AM2016-05-11T01:17:09+5:302016-05-11T01:17:09+5:30

नॅशनल फिल्म इन्स्टिट्यूट (एफटीआयआय) आणि रानडे इन्स्टिट्यूटला पाठविण्यात आलेल्या ‘लेटरबॉम्ब’सोबत पाठवण्यात आलेल्या डिटोनेटरसह ‘अमोनियम नायटे्रट’ पावडर असल्याचे समोर आले आहे

Ammonium nitrate in letter bomb | लेटरबॉम्बमध्ये अमोनियम नायटे्रट

लेटरबॉम्बमध्ये अमोनियम नायटे्रट

Next

पुणे : नॅशनल फिल्म इन्स्टिट्यूट (एफटीआयआय) आणि रानडे इन्स्टिट्यूटला पाठविण्यात आलेल्या ‘लेटरबॉम्ब’सोबत पाठवण्यात आलेल्या डिटोनेटरसह ‘अमोनियम नायटे्रट’ पावडर असल्याचे समोर आले आहे. बॉम्बशोधक व नाशक पथकाच्या तपासणीमधून ही बाब उघडकीस आली असून हे पार्सल दोन्ही संस्थांना पोहोचवणाऱ्या पोस्टमनचे जबाब नोंदविण्यात आल्याची माहिती परिमंडल एकचे उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली.
एफटीआयआय आणि रानडे इन्स्टिट्यूटला शनिवारी पोस्टाद्वारे डिटोनेटर, स्फोटक पावडरसोबत ‘तुम्ही कन्हैयाकुमारला पाठिंबा दिला. त्यामुळे आम्ही हाय एक्स्प्लोजिव्ह पाठवत आहोत,’ असे पत्र पाठविण्यात आले होते. या दोन्हीही पार्सलमधील स्फोटके आणि पत्र सारखेच असल्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही स्फोटके पुण्यामधूनच पाठविण्यात आलेली असून पोस्टाकडून माहिती मागवण्यात येत आहे. हे पार्सल नेमके कोणत्या पोस्ट पेटीमधून कोणत्या मार्गाने दोन्ही संस्थांमध्ये पोहोचले, त्याचा शोध सुरू आहे. यासोबतच सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे.
>ज्या दोन पोस्टमनने हे पार्सल एफटीआयआय आणि रानडेमध्ये पोहोचवले आहेत त्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. यासोबतच जिलेटिन, डिटोनेटर विकणाऱ्या विक्रेत्यांकडेची चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संभाजी ब्रिगेडला आलेल्या स्फोटकांमध्ये आणि या दोन्ही संस्थांना आलेल्या स्फोटकांमध्ये साम्य असून या प्रकरणांचा तपास शेवटपर्यंत नेणार असून यामागे नेमके कोण आहे, याचा शोध नक्की घेतला जाईल, असे हिरेमठ यांनी सांगितले.

Web Title: Ammonium nitrate in letter bomb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.