Amol Kolhe : "निवडणुका संपणार, सरकारचे खरे रुप दिसणार; पेट्रोल-डिझेलचे दर जोराची उसळी घेणार"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 02:11 PM2022-03-07T14:11:41+5:302022-03-07T14:24:54+5:30

Amol Kolhe Slams Modi Government Over Petrol Diesel Price : इंधन दरवाढीवरून अमोल कोल्हेंनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

Amol Kolhe Slams Modi Government Over Petrol Diesel Price | Amol Kolhe : "निवडणुका संपणार, सरकारचे खरे रुप दिसणार; पेट्रोल-डिझेलचे दर जोराची उसळी घेणार"

Amol Kolhe : "निवडणुका संपणार, सरकारचे खरे रुप दिसणार; पेट्रोल-डिझेलचे दर जोराची उसळी घेणार"

Next

रशिया-युक्रेनमधील युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे (ब्रेंट क्रूड) दर प्रति बॅरल ११४ डॉलरपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. यामुळे लवकरच देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) प्रतिलिटर मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. देशातील निवडणुकांनंतर इंधन दरवाढीचे बॉम्ब कोसळू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे. या एकूणच पार्श्वभूमीवर पेट्रोलियम कंपन्या इंधनदरात नेमक्या किती रुपयांची वाढ करतात, या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. याच दरम्यान इंधन दरवाढीवरून अमोल कोल्हेंनी (Amol Kolhe) मोदी सरकारवर (Modi Government) जोरदार निशाणा साधला आहे. "निवडणुका संपणार, सरकारचे खरे रुप दिसणार" असं म्हटलं आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "निवडणुका संपणार, सरकारचे खरे रुप दिसणार, इतके दिवस निपचित पडून असलेले पेट्रोल-डिझेलचे दर जोराची उसळी घेणार! उन्हाचा भडका झालाय, तसा इंधन दर वाढीचाही होणार" असं कोल्हे यांनी म्हटलं आहे. गेल्या १२३ दिवसांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. १० मार्च रोजी देशभरातील पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर पेट्रोल आणि डिझेल दरात तब्बल २५ रुपयांची वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कच्च्या तेलाच्या दरात वाढल्याने महसूल कमी होत असल्याने सरकारकडे पेट्रोल-डिझेल दरात वाढ करण्याशिवाय पर्याय नाही, असे सांगितले जात आहे. 

केंद्रातील मोदी सरकारची निवडणूक ऑफर लवकरच संपुष्टात येणार असून, देशवासीयांना आतापासूनच वाहन्यांच्या टाक्या फुल करून घ्याव्यात, अशी खोचक टीका काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी ट्विटरवरून केली होती. कमॉडिटी बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव ११४.२३ डॉलर प्रती बॅरल इतका वाढला. त्यात ३ टक्के वाढ झाली. अपुऱ्या इंधन पुरवठ्यामुळे अमेरिकेतील तेल साठा कमी होत आहे. विशेषत युरोपात मागील आठवडाभरात कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे.

मुंबई, दिल्लीत पेट्रोलचा दर काय?

मुंबईत एक लीटर पेट्रोलचा दर १०९.९८ रुपयांवर आहे. दिल्लीत पेट्रोल ९५.४१ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा दर १०१.४० रुपये आहे. कोलकाता येथे एक लीटर पेट्रोल १०४.६७ रुपयांवर स्थिर आहे. भोपाळमध्ये पेट्रोलचा भाव १०७.२३ रुपये आहे. तर देशात सर्वांत कमी दरात पेट्रोल आणि डिझेल लखनऊ शहरात मिळत असून, एक लीटर पेट्रोलचा भाव ९५.२८ रुपये आहे.


 

Web Title: Amol Kolhe Slams Modi Government Over Petrol Diesel Price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.