Maharashtra Political Crisis: “मुख्यमंत्री ‘खऱ्या’ शिवसेनेचे असतील, तर भाजपसोबतची युती तोडण्याची हिंमत दाखवणार का?”

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 12:42 PM2022-08-02T12:42:54+5:302022-08-02T12:44:29+5:30

Maharashtra Political Crisis: एकटे देवेंद्रजी कोणाकोणाला वाचवणार, अशी विचारणा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

amol mitkari criticized bjp devendra fadnavis over governor statement and ncp asked questioned eknath shinde over jp nadda claims | Maharashtra Political Crisis: “मुख्यमंत्री ‘खऱ्या’ शिवसेनेचे असतील, तर भाजपसोबतची युती तोडण्याची हिंमत दाखवणार का?”

Maharashtra Political Crisis: “मुख्यमंत्री ‘खऱ्या’ शिवसेनेचे असतील, तर भाजपसोबतची युती तोडण्याची हिंमत दाखवणार का?”

Next

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रात एकीकडे संजय राऊतांवर ईडीने कारवाई करत केलेली अटक, नव्या शिंदे-भाजप सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार यांवरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केलेल्या विधानावरून देशभरातील वातावरण ढवळून निघताना दिसत आहे. राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा करत आहेत, याचाच धागा पकडून, मंत्री ‘खऱ्या’ शिवसेनेचे असतील, तर भाजपसोबतची युती तोडण्याची हिंमत दाखवणार का, अशी विचारणा राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे. 

देशातील कोणत्याही राष्ट्रीय पक्षात भाजपशी लढण्याचे सामर्थ्य राहिलेले नाही. महाराष्ट्रात शिवसेनेला घरघर लागली आहे. काँग्रेसचेही अनेक राज्यांतून गाशा गुंडाळणे सुरू आहे. उर्वरित सर्व पक्षही संपतील, देशात केवळ भाजप राहील. कोणताही पक्ष भाजपला मात देऊ शकत नाही, असा दावा जेपी नड्डा यांनी केला होता. यानंतर, भाजपवर सडकून टीका केली जात आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप आणि एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. 

मुख्यमंत्री ‘खऱ्या’ शिवसेनेचे असतील, तर भाजपसोबतची युती तोडण्याची हिंमत दाखवणार का?

प्रादेशिक पक्ष राज्यांतर्गत अस्मिता जपण्याचे काम करत असतात. त्यांना संपवण्याची आसुरी महत्त्वाकांक्षा भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी जाहीर केली आहे. हा छुपा अजेंडा सत्तेत आल्यापासून भाजप राबवत आहेच... तरी आता उघडपणे बोलण्यापर्यंत भाजप अध्यक्षांची मजल गेली आहे. मुख्यमंत्री जर ‘खऱ्या’ शिवसेनेचे मुख्यमंत्री असतील तर जे. पी. नड्डांच्या वक्तव्याचा निषेध करत आपल्या पक्षाची अस्मिता जपण्यासाठी भाजपसोबतची युती तोडण्याची हिंमत ते आता दाखवणार का?, अशी थेट विचारणा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनीही भाजपवर हल्लाबोल केला आहे. 

एकटे देवेंद्रजी कोणाकोणाला वाचवणार?

JP "नड्डा" जे बोलले ते वक्तव्य भविष्यात भाजपसाठीच मोठा "खड्डा" ठरेल .त्यांना वाटते तितकी सोपी ही गोष्ट नाही .या देशात हुकूमशाही नाही तुम्हीं कितीही फडफड केली तरी संविधानाला धक्का लाऊ शकणार नाही. हे लक्षात ठेवा, अशी टीका अमोल मिटकरींनी केली आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांनी केलेले विधान आणि नड्डा यांच्या वक्तव्यावरून सावरून घेण्याचा प्रयत्न केला. यावरही अमोल मिटकरींनी टोला लगावला आहे. राज्यपालांना तसं म्हणायचं नव्हतं, नड्डाजींना तसं म्हणायचं नव्हतं, एकटे देवेंद्रजी कोणाकोणाला वाचवणार, असा खोचक सवालही मिटकरींनी केला आहे. 
 

Web Title: amol mitkari criticized bjp devendra fadnavis over governor statement and ncp asked questioned eknath shinde over jp nadda claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.